Health Tips : हार्ट, स्किन अन् तणाव मिनिटात दूर करणारे चॉकलेट

कोणत्याही सण उत्सवात एकमेकांना तुम्ही चॉकलेट भेट म्हणून दिले असेल.
Health Tips
Health TipsSakal
Updated on

Health Tips : कोणत्याही सण उत्सवात एकमेकांना तुम्ही चॉकलेट भेट म्हणून दिले असेल. कारण लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना चॉकलेट खाण्यास आवडते. परंतु, यात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अति सेवनामुळे याचा शरिरावर विपरित परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Health Tips
डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या !

मात्र, जर आम्ही तुम्हला अशा एका चॉकलेटबद्दल सांगितले ज्यामुळे ह्रदय, त्वचा आणि तणावापासून आराम मिळण्यास मदत होते. तर, तुमचा विश्वास बसेल का? तर, अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु, आज आम्ही चॉकलेटच्या अशाच एका प्रकाराबद्दल सांगणार आहोत. हे चॉकलेट दुसरे तिसरे कोणते नसून डार्क चॉकलेट आहे.

Health Tips
Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

गरोदरपणात डार्क चॉकलेट फायदेशीर

डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. गरोदरपणात याचे सेवन केल्याने रॅडिकल्सपासून रक्षण होण्यास मदत होते.

तणाव होतो दूर

आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकांना तणावाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येतही डार्क चॉकलेट उपयुक्त ठरू शकते. डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन नावाचे रसायन असते. ज्यामुळे तणाव होण्यास आणि मन शांत होण्यास मदत होते.

Health Tips
सुंदर तरूणीला बघताच तुमच्याही ह्रदयाची वाढते धडधड?...मग हे आहे कारण?

हृदय राहते तंदुरुस्त

एका संशोधनानुसार, ज्या महिला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डार्क चॉकलेटचे सेवन करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.

पिरिएड्सदरम्यान कमी होतात वेदना

डार्क चॉकलेटमध्ये एंडोर्फिन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

Health Tips
Health: हिवाळ्यात या पद्धतीने घ्या कोरड्या त्वचेची काळजी!

त्वचेसाठी फायदेशीर

एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती डार्क चॉकलेटचे मर्यादित प्रमाणात सेवन करतात, त्यांची त्वचा तरूण आणि निरोगी राहते. डार्क चॉकलेटमुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com