Day Sleep Causes Blindness : दुपारी झोपल्याने येऊ शकतं अंधत्व, संशोधनातून आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Day Sleep Causes Blindness

Day Sleep Causes Blindness : दुपारी झोपल्याने येऊ शकतं अंधत्व, संशोधनातून आलं समोर

Why Day Sleep Causes Blindness : हिवाळ्यात गुलाबी थंडीत मस्त पांधरूण ओढून झोपावसं तुम्हालाही वाटत असेल. झोप कोणाला आवडत नाही. सर्वांनाच झोपायला आवडतं. त्यामुळे शरीर मन सगळंच रिलॅक्स होतं. विशेषतः महिलांना दिवसभराचं काम झाल्यावर दुपारी झोपायला आवडतं.

Afternoon sleep

Afternoon sleep

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ७-८ तासांची झोप आरोग्यासाठी आवश्यक असते. ती मिळाली तरी जर दिवसा वेळ असेल तर दुपारी झोप काढण्याची संधी आपण सोडत नाही. पण जर तुम्ही असं करत असाल तर आताच बंद करा. एका अभ्यासानुसार जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर त्याचा तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. ही समस्या गांभीर्याने घ्यायला हवी कारण यामुळे अंधत्व येऊ शकतं.

हेही वाचा: Health Tips: वजन कमी करण्यासाठी रोज ओट्स खाताय? आधी हे वाचा

काय सांगतो अभ्यास

या अभ्यासात ४० ते ७० वयोगटाच्या ४ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांचं निरीक्षण करण्यात आलं. ज्यापैकी ८,६९० लोकांना ग्लूकोमाची तक्रार होती. संशोधकांना असं आढळलं की, जे लोक रात्री पूर्ण झोप झाल्यावरही दुपारी घोरतात, त्यांच्यात ग्लूकोमाचा धोका ११ टक्क्यांनी वाढतो. दिवसा झोपल्याने तुम्हाला अंधत्व येऊ शकतं. संशोधकांचं म्हणणं आहे की, २०४० पर्यंत जगभरातलं ११.२ टक्के लोक ग्लूकोमाचे बळी ठरू शकतात.

हेही वाचा: Men's Health Tips: पुरुषांनी लोणचे का खाऊ नये? कारण वाचाल तर अवाक व्हाल...

glaucoma

glaucoma

कसा वाढतो ग्लुकोमा आजार

तज्ज्ञांच्या मते झोपेची कमी किंवा अनिद्रेमुळे ग्लुकोमाचा धोका वाढतो. डोळ्यांच्या दबावामुळे संबंधित ऑप्टिक नर्वला नुकसान पोहचतं. यालाच ग्लुकोमा म्हणतात. ज्यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते. स्लीप एपनिया असणाऱ्या लोकांमध्ये ग्लूकोमा होण्याची शक्याता १० टक्के वाढते. ग्लुकोमा डोळ्यांपासून डोक्यापर्यंत जाणाऱ्या ऑप्टिक तंत्रिकाला प्रभावित करतो. त्यामुळे डोळ्यांच्या प्रकाश संवेदशील कोशिकांवर त्याचा परिणाम होतो. योग्यवेळी इलाज न केल्यास कायमच अंधत्व येऊ शकतं.

टॅग्स :BlindSleep health