थोडक्यात:
डेंग्यूचे लक्षणं तापाशिवायही दिसू शकतात, जसे थकवा, सौम्य ताप आणि शरीरदुखी.
डेंग्यूची गंभीर लक्षणं म्हणजे लालसर ठिपके, रक्तस्त्राव, आणि प्लेटलेट्स कमी होणे.
डेंग्यूपासून बचावासाठी साचलेले पाणी काढा, मच्छरदाणी वापरा आणि संतुलित आहार घ्या.
Dengue Symptoms Without Fever: डेंग्यू नाव ऐकताच बहुतेक लोकांना फक्त ताप, वेदना आणि प्लेटलेट्स कमी होणेच समजते. पण खरे तर डेंग्यू फक्त तापाचा आजार नाही, तो शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, ज्या सुरुवातीला दिसत नाहीत. पावसाळ्यात मच्छरांची संख्या वाढते आणि त्यामुळे डेंग्यूचा धोकाही वाढतो. मच्छराच्या चाव्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करतो आणि हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागतात.