Dental Care : अक्कलदाढेचा उपयोग काय ? अकलेशी संबंध नसलेल्या या दाढेबद्दल् डॉक्टर म्हणतात..

मात्र 28 दात हे सर्वांना असतात ,परंतु उरलेले चार दात कालांतराने येतात.
Dental Care
Dental Care Sakal

Dental Care - अक्कलदाढी बद्दलची साधारण माहिती

काळाच्या ओघात मानवी शरीरात अश्मयुगापासून आतापर्यंत अनेक बदल होत आले.त्यातला एक बदल म्हणजे माणसाचा जबडा अगोदर मोठा होता आता तो छोटा झालेला आहे. सुरुवातीपासून मानवी दातांची संख्या 32 च आहे.

मात्र 28 दात हे सर्वांना असतात ,परंतु उरलेले चार दात कालांतराने येतात.ते चार दात 15 वर्षाच्या पुढे कधीही येतात.ते चार दात म्हणजे अक्कलदाढ होय. अक्कलदाढ ही दातांच्या सर्वात पाठीमागच्या बाजूला असते.

Dental Care
Rice Man: भाताचे 10 प्रकार शोधून काढणारी 'ही' मराठी व्यक्ती माहितीये का?

अक्कलदाढ का दुखते ?

अक्कलदाढ ( Wisdom tooth ) येई तोपर्यंत मानवी जबड्याची पूर्णपणे वाढ झालेली असते. अक्कलदाढ येते तेव्हा हिरड्यांवर दबाव टाकते. इथे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे.

मानवी जबडा छोटा झालेला आहे. त्यामुळे त्यात दातांना तडजोड करावी लागते. दातांचं एकमेकांवर प्रेशर येतं थोडक्यात काय ? आपल्या भाषेत तर तोंडात दातांची गर्दी होते. त्यामुळे त्याच्या वेदना होतात किंवा अक्कलदाढ दुखते असं म्हणता येईल.

Dental Care
Health Tips : हाडांना पुरेपूर कॅल्शियम देतील, हे ५ पदार्थ

अक्कलदाढ बाहेर आल्यावर काय होते ?

मित्रांनो एक गोष्ट आपण आपल्या आरोग्यासाठी लक्षात घेतली पाहिजे, अक्कलदाढ ही सर्वात मागे असते त्यामुळे तिथे स्वच्छता ठेवणे अवघड असतं. त्यामुळे तिथे कीड लागू शकते किंवा खाल्लेल्या अन्नाचे कण राहू शकतात. बऱ्याचदा तिथे उपचार करणं सुद्धा अवघड असते. त्यामुळे डॉक्टर अक्कलदाढ काढण्याचा सल्ला देतात.

Dental Care
Health Tips: फळं की फळांचा ज्यूस? शरीरासाठी योग्य काय? जाणून घ्या

याबद्दल आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी काय सांगितले वाचा.

अक्कलदाढ (Third molar) खाण्याच्या किंवा दिसण्याच्या कामात येत नाही. आणि तिचा उपचार करणं अवघड असतं. म्हणून तिला काढणं हाच उत्तम पर्याय आहे.

डॉक्टर नुपूर पाटनी,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com