
Diabetes May Cause Skull Bone Infection, Warn ENT Experts at 'Mentcon' Conference
sakal
मधुमेहामुळे कवटीच्या भागातील संसर्ग (स्कल बेस हाडाचा ऑस्टिओमायलिटिस) हा संसर्ग आजार अलिकडे वाढत आहे. या आजारामुळे बाधित भागाचे हाड वितळू शकते किंवा कमकुवत होऊ शकते. लवकर निदान झाल्यास प्रतिजैविके प्रभावी ठरू शकतात. अन्यथा शस्त्रक्रिया हाच पर्याय उपलब्ध आहे, असे मत कोची येथील टी. एन. जानकीराम यांनी आज येथे व्यक्त केले.