Diabetes Tips : डायबेटीजच्या रुग्णांसाठी या 5 औषधी वनस्पती अमृतासमान

सध्याच्या काळात बहुतांश लोक हृदय रोगांच्या समस्येने त्रस्त
Diabetes Tips
Diabetes Tipsesakal

Diabetes Tips : सध्याच्या काळात बहुतांश लोक हृदय रोगांच्या समस्येने त्रस्त आहेत. काही लोकांना तर हा त्रास कधी होतो हे देखील माहित पडत नाही. बिग बॉस 13 विजेता आणि बालिका वधू या सुप्रसिद्ध मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हरहुन्नरी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला असेल, मागच्या काही महिन्यांपूर्वी कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार असेल की कॉमेडियन राजू श्रीवास्तव असतील या सगळ्यांचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला.

Diabetes Tips
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असताना देखील हार्ट अटॅकने लोकांचा मृत्यू होतोय. जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका जास्त असतो. खरं तर हाय शुगर लेव्हलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आणि नसा खराब होतात.

Diabetes Tips
Healthy Snacks : ऑफिसमध्ये एनर्जेटीक रहायला मदत करतील असे भन्नाट पदार्थ

आयुर्वेदात अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत, ज्यामुळे डायबेटिजचे लोक हृदयविकारापासून लांब राहू शकतील. डायबेटिज असलेल्या लोकांना (विशेषत: ज्येष्ठ नागरिक) हार्ट डिसीज (हाय कोलेस्टेरॉल, हाय बीपी) होण्याची शक्यता असते. कारण डायबेटिजच्या औषधांमुळे मेटाबॉलिज्म आणि लिव्हरचं काम मंदावतं. अशात काही वनस्पतींमुळे तुमची शुगर कंट्रोल होऊ शकते. ज्याचा फायदा तुम्ही हृदरोगाशी संबंधित आजारापासून लांब राहू शकता.

Diabetes Tips
Crude Oil : इराक, सौदी अरेबिया ना अमेरिका, भारत घेतोय "या" देशाकडून सर्वात जास्त क्रूड ऑइल

१. पुनर्नवा

तज्ज्ञ सांगतात, पुनर्नवा ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती मूत्रवर्धक असते. यामुळे रक्तातील साखर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळी साज कमी करता येते. या वनस्पतीच्या वापराने लिव्हर, किडनी आणि डोळ्यांचं काम सुधारतं. (डायबेटिक रेटिनोपॅथी, नेफ्रोपॅथी रोखण्यासाठी उपयुक्त). यासोबतच चयापचय क्रियाही सुधारते. दररोज उपाशीपोटी 2-5 ग्रॅम वनस्पतीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

Diabetes Tips
Parenting Tips : ट्रॅव्हल, फूड नव्हे तर, पॅरेंटिंगच्या 'या' टिप्स ठरल्या 2022 मध्ये हीट

२. सुंठ

ह्रदय आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी सुंठ पावडर घेणं फायदेशीर ठरतं. याच्या वापरामुळे अवयवांवर जी सातत्याने सूज येते, ती कमी होते. तसेच हृदयविकारासह अनेक घातक आजारांचा धोका कमी होतो.

दिवसातून एकदा जेवणापूर्वी कोमट पाण्यासोबत ही सुंठ पावडर घेता येते.

Diabetes Tips
Couple Goals : हेल्दी रिलेशनशिपसाठी 2023 मध्ये करा या गोष्टींच पालन

३. काळी मिरी

या वनस्पती प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता, चयापचय क्रिया वाढवणं, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यात मदत होते. या औषधी वनस्पतींमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होण्याची शक्यता असल्याचं तज्ञमंडळी सांगतात.

रोज सकाळी 1 काळी मिरी खाणं सुद्धा आरोग्यदायी असतं.

Diabetes Tips
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

४. वेलची

चव आणि सुगंध असलेली वेलची हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी वापरली जाते. यासोबतच वारंवार तहान लागणे यासारख्या मधुमेहाच्या लक्षणांपासून मुक्ती देण्याचं काम करते.

तुम्ही वेलची पूड एकतर चहात टाकू शकता किंवा मग 1 वेलचीची पूड जेवणानंतर 1 तासाने कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.

Diabetes Tips
Cancer Vaccine : खुशखबर! कॅन्सरचा धोका टळला; डॉक्टरांनी शोधल वॅक्सिन

5. अर्जुन साल

अर्जुनाची साल ही हृदयविकार टाळण्यासाठी तसेच हृदयाचं कार्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम औषधी वनस्पती आहे. याच्या सेवनाने रक्तदाब, कोलेस्टेरॉल ते टॅचीकार्डियापर्यंत सर्व प्रकारच्या हृदयाच्या समस्या दूर होतात.

याच्या सालीचा चहा झोपण्यापूर्वी नियमितपणे घेतला जातो.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com