Healthy Vision : वयोमानानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या आजाराचे वेळीच करा नियोजन

एएमडी हा पुरोगामी आजार आहे, ज्‍याचा सुस्‍पष्‍ट दिसण्‍यामध्‍ये मदत करणारा रेटिनाचा (नेत्रपटल) लहान मध्‍य भाग मॅक्‍युलावर (बुबुळ) परिणाम होता.
Healthy Vision
Healthy Visiongoogle

मुंबई : मे हा हेल्‍दी व्हिजन मंथ आहे आणि या महिन्‍यामध्‍ये डोळ्यांचे आरोग्‍य उत्तम राखण्‍याचे महत्त्व समजून घेण्‍याची उत्तम संधी मिळते. एज-रिलेटेड मॅक्‍युलर डिजनरेशन (एएमडी) आणि डायबेटिक मॅक्‍युलर एण्‍डेमा (डीएमई) हे रेटिनल आजार आहेत, ज्‍यांचा वाढत्‍या वयासह आपल्‍या डोळ्यांच्‍या दृ‍ष्‍टीवर मोठा परिणाम होऊ शकते.

चिन्‍हे, लक्षणे, जोखीम घटक आणि लवकर तपासणी, वेळेवर उपचाराचे महत्त्व, तसेच जीवनशैलीमधील बदल माहित असण्‍यासह या आजारांवर प्रभावीपणे प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते.

भारतातील वृद्ध लोकसंख्येच्या वाढीमुळे २०३० पर्यंत देशात १.५४ दशलक्ष एएमडी रुग्ण आणि ५.१ दशलक्ष डीएमई रुग्ण असतील अशी अपेक्षा आहे. यामुळे लवकर निदान व व्‍यवस्‍थापन महत्त्वाचे आहे. (diabetic macular edema age related macular degeneration )

मुंबईतील मुंबई रेटिना सेंटरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व विट्रेओरेटिनल सर्जन प्रो. डॉ. अजय दुदानी म्‍हणाले, ‘‘मी तपासणी करणाऱ्या एकूण रूग्‍णांपैकी ३० टक्‍के रूग्‍ण एज-रिलेटेड मॅक्‍युलर डिजनरेशन किंवा डायबेटिक मॅक्‍युलर एण्‍डेमाने पीडित आहेत.

जवळून या आजाराची स्थिती पाहण्‍यासह त्‍यांचे निदान उपचार केले असल्‍यामुळे मी लवकरात लवकर डोळ्यांच्‍या आजाराची चिन्‍हे व लक्षणे निदान करण्‍याच्‍या महत्त्‍वाला अधिक प्राधान्‍य देतो. वेळेवर निदान व उपचार आजाराच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्‍वाचे आहे.

विशेषत: ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे, कारण वाढत्‍या वयासह एएमडी व डीएमई सारखे आजार प्रगत होऊ शकतात आणि त्‍याकडे दुर्लक्ष केले तर दृष्‍टी जाण्‍यासोबत आंधळेपणा येऊ शकतो.’’

एएमडी हा पुरोगामी आजार आहे, ज्‍याचा सुस्‍पष्‍ट दिसण्‍यामध्‍ये मदत करणारा रेटिनाचा (नेत्रपटल) लहान मध्‍य भाग मॅक्‍युलावर (बुबुळ) परिणाम होता. यामुळे अंधुक दिसणे, विकृती आणि मध्‍य व्हिजनमध्‍ये ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट्स असा त्रास होऊ शकतो, ज्‍यामुळे वाचन, ड्रायव्हिंग अशा दैनंदिन क्रिया करणे किंवा चेहरे ओळखणे अवघड होऊ शकते.

नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्‍या मते, एएमडी हे ५० वर्ष व त्‍यापेक्षा अधिक वय असलेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये दृष्‍टी जाण्‍याचे प्रमुख कारण आहे.

दुसरीकडे, डीएमई हे मधुमेहाची गुंतागूंत आहे, जो रक्‍तातील उच्‍च शर्करा पातळ्यांमुळे रेटिनामधील रक्‍तवाहिन्‍यांचे नुकसान झाल्‍यामुळे उद्भवतो. वेळेवर उपचार न केल्‍यास दृष्‍टी जाणे व अंधत्‍व येऊ शकते. डीआरच्‍या लक्षणांमध्‍ये अंधुक दिसणे, फ्लोटर्स आणि अंधुक प्रकाशात दिसण्यात अडचण यांचा समावेश आहे.

एएमडी व डीएमईच्‍या केसेसमध्‍ये आजाराची तीव्रता योग्‍य व्‍यवस्‍थापनासह कमी करता येऊ शकते. यामध्‍ये पुढीलप्रमाणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते:

• नियमित नेत्र तपासणी व देखरेख: एएमडी व डीएमई लक्षणांची काळजी कशी घ्‍यावी हे माहित असण्‍यामधील पहिली पायरी म्‍हणजे ऑफ्थॅल्‍मोलॉजिस्‍टकडून (नेत्ररोग तज्ञ) डोळ्यांची सविस्‍तर तपासणी करणे, जे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी वर्षातून किमान एकदा केले पाहिजे.

व्‍यक्‍तीच्‍या रेटिनाची सखोल तपासणी आणि ऑप्टिक नर्व्‍हचे स्‍कॅनिंग केल्‍याने ऑफ्थॅल्‍मोलॉजिस्‍टला दिसून येण्‍यापूर्वीच्‍या नुकसानाच्‍या चिन्‍हांचे निदान करण्‍यास मदत होऊ शकते.

निदान झाले असल्‍यास व्‍यक्‍तीची स्थिती व उपचाराच्‍या परिणामांची तपासणी करण्‍यासाठी वारंवार डॉक्‍टरांना भेट द्यावी. वैद्यकीय उपचारासोबत व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या दृष्‍टीची तपासणी करणे आणि कोणत्‍याही विकृतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

• रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवा : रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे मधुमेही डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढू शकतो. या दोन्‍ही घटकांवर नियंत्रण ठेवल्‍यास व्यक्तीची दृष्‍टी उत्तम राहण्‍यासोबत संपूर्ण आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होईल.

• आरोग्‍यदायी आहाराचे सेवन : काले, पालक व कोलर्ड ग्रीन्‍स अशा हिरव्‍या पालेभाज्‍या आणि व्हिटॅमिन ए, सी व ई सारखी प्रमुख व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स, बीटा-कॅरोटीन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, ल्‍यूटेन, झेक्‍सान्थिन व झिंग असलेली ताजी फळे यांचा समावेश असलेला आरोग्‍यदायी संतुलित आहार मोतीबिंदू व मॅक्‍युलर डिजनरेशन विकसित होण्‍याचा धोका कमी करण्‍यास मदत करू शकतो.

• डोळ्यांचे संरक्षण : प्रखर सूर्यप्रकाशात जाणे टाळल्‍यास डोळ्यांचे संभाव्‍य नुकसानापासून संरक्षण होण्‍यास मदत होऊ शकते. प्रखर सूर्यप्रकाशात सनग्‍लासेस, वायजर असलेल्‍या हॅट्स परिधान केल्‍यास संभाव्‍य घातक अल्‍ट्रा-व्‍हायोलेट (यूव्‍ही) किरणांपासून संरक्षण होण्‍यास मदत होऊ शकते.

तरमग, चला यंदा मे महिन्‍यात व त्‍यापुढे देखील डोळ्यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य देण्‍याचे वचन घेऊया. ऑप्‍टोमेट्रिस्‍टसोबत नेत्र तपासणीचे वेळापत्रक तयार करा आणि आरोग्‍यासाठी उत्तम आरोग्‍यदायी निवडी करा. आरोग्‍यदायी निवडी करत आपण एएमडी व डीएमई सारख्‍या डोळ्यांच्‍या आजारांवर प्रतिबंध व नियंत्रण ठेवू शकतो, ज्‍यामुळे आपल्‍याला सुस्‍पष्‍ट दृष्‍टीसह इतर गोष्‍टींचा आनंद घेता येऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com