डाएटसाठी सतत Sprouts खाताय? फायद्यांएवजी होवू शकतं नुकसान

sprouts salad side effects: योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे अंकुरित धान्यांचं सेवन न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या Health Problems निर्माण होवू शकतात
disadvantages of eating sprouts
disadvantages of eating sproutsEsakal

Disadvantages of eating sprouts: अंकुरित धान्य किंवा कडधान्याचं सेवन करणं Sprouts हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. खास करून अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये Diet स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेल्या विविध कडधान्यांचा समावेश करत असतात. Diet Health Tips in Marathi What is the right method to eat Sprouts

शाकाहारी पदार्थांमध्ये अंकुरीत कडधान्य Sprouts हे प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत मानलं जातं. यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज Calories असतात. तसचं यात फॉलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅग्निज, विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळतं. 

धान्यांना जेव्हा मोड येतात तेव्हा त्यातील पोषक तत्व दुप्पट होतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. यामुळे चयापचय क्रिया Metabolism सुधारून पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वजन कमी होण्यास Weight Loss मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का ज्याप्रमाणे अंकुरित धान्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत. त्याचप्रमाणे नुकसानही आहे. 

योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे अंकुरित धान्यांचं सेवन न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या Health Problems निर्माण होवू शकतात. याचसाठी आम्ही तुम्हाला स्प्राउट्समुळे आरोग्याचं होणारं नुकसान आणि ते टाळण्यासाठी अंकुरित धान्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत याबद्दल माहिती देणार आहोत. 

हे देखिल वाचा-

disadvantages of eating sprouts
Sprouted Wheat : अंकुरित गहू खाण्याचे 3 जबरदस्त फायदे, एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा

अंकुरित धान्यामुळे होणारं नुकसान

स्प्राउट्स कच्चे खाण जीवावर बेतू शकतं. स्प्राउटस् हे कडधान्यापासून तयार होत असतात. अनेकदा त्यामध्ये कोलाई आणि सॅल्मोना हे हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. कच्च्या स्प्राउट्सच्या सेवनामुळे हे बॅक्टेरिया पोटात जाऊन फूट पॉयझनिंग म्हणजेच विषबाधा होण्याची शक्यता असते. 

यातील बॅक्टेरियामुळे पोटात दुखणं, डायरिया किंवा उलटीचा त्रास देखील होवू शकतो. 

खास करून लहान मुलं, वयोवृद्ध आणि गरोदर महिला म्हणजेच नाजूक पचनशक्ती असलेल्यांना कच्च्या अंकुरित धान्याच्या सेवनामुळे अधिक त्रास जाणवू शकतो. 

तसंच सध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणात कच्चे स्प्राउट्स खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होवू शकतात.

स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धत

आहारामध्ये स्प्राउट्स म्हणजेच अंकुरित धान्य आणि कडधान्याचा समावेश करत असताना ते शिवजवून खाणं जास्त योग्य ठरतं.

यामुळे यातील बॅक्टेरिया मरतात आणि आरोग्यासाठी ते धोकादायक ठरत नाहीत. यासाठी तुम्ही एका पॅनमध्ये थोड तेल घेऊन त्यात स्प्राउट्स चांगले रोस्ट करून घ्या, ५-१० मिनिटांसाठी स्प्राउट्स भाजल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील. 

याशिवाय तुम्ही पाण्यामध्ये १०-१५ मिनिटांसाठी अंकुरित धान्य मीठ टाकून शिजवून त्याचं सेवन करू शकता. यामुळे देखील बॅक्टेरिया नष्ट होतील. शिवाय गॅसची समस्या देखील होणार नाही. 

जर तुम्ही प्रोटीनयुक्त आहार म्हणून स्प्राउट्सचं सेवन करत असाल तर तुम्ही नाश्त्यामध्ये स्प्राउट्सचा डोसा देखील खाऊ शकता. एकंदर स्प्राउट्स कच्चे न खाता त्याचं शिजवून सेवन केल्यास त्यातील बॅक्टेरिया नष्ट होत असल्याने फूड पॉयझनिंग किंवा इतर समस्या निर्माण होण्याचा धोका दूर होतो.

हे देखिल वाचा-

disadvantages of eating sprouts
Healthy Sprout Chaat recipe : चटपटीत चव अन् खायला पौष्टिक, १० मिनिटांत तयार होणारी नाश्ता रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com