ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमधील फरक

लोक व्हाईट ब्रेडऐवजी मल्टी ग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड खातात. परंतु तुम्ही खात असलेल्या या मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेडमध्ये नेमका काय फरक
difference between brown and white bread health fitness
difference between brown and white bread health fitnessSakal
Summary

लोक व्हाईट ब्रेडऐवजी मल्टी ग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड खातात. परंतु तुम्ही खात असलेल्या या मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेडमध्ये नेमका काय फरक

- डॉ. कोमल बोरसे

आरोग्य, फिटनेसकडे आपण हल्ली इतके लक्ष देतो की, आपण खात असलेल्या पदार्थांमधून पोषणतत्त्वे मिळावी असे वाटते. लोक व्हाईट ब्रेडऐवजी मल्टी ग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड खातात. परंतु तुम्ही खात असलेल्या या मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेडमध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला ही माहिती नसेल तर आज ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमधील नेमका न्युट्रीशनल फरक काय हे जाणून घेणार आहोत.

मग करुया सुरुवात भारताबरोबरच जगभरातील बहुतांश लोक सकाळची सुरुवातच पांढऱ्या ब्रेडने (व्हाईट ब्रेड) करतात. सकाळच्या वेळी धावपळ असेल तर व्हाइट ब्रेड आणि बटर खाऊन नाश्ता करतात. मात्र यामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम कदाचित तुम्हाला माहीत नसतील. व्हाइट ब्रेडचे नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देत असता.

ब्रेड बनवण्याची पद्धत ही एकच आहे आणि यासाठी साहित्यही अगदी सारखेच वापरले जाते. ब्रेड बनवण्यासाठी मैदा, पाणी, मीठ आणि ईस्ट हे साहित्य वापरले जाते. आता वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेड बनवताना त्यामध्ये वेगवेगळ्या वाढीव गोष्टी घातल्या जातात. आता सगळीकडे ब्राऊन ब्रेडची क्रेझ वाढत आहे.

गव्हापासून बनविलेला ब्राऊन ब्रेडच चांगला असतो. हल्ली केवळ गव्हाचा रंग येण्यासाठी रंग वापरला जातो. त्यामुळे तुम्ही या गोष्टीपासून सावध असावे. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या ब्राऊन ब्रेडचे पॅकेट नीट पाहा. त्यामध्ये लिहिलेली न्युट्रीशनची यादी तपासा. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा ब्राऊन ब्रेड गव्हापासून बनवलेला आहे की नाही.

गव्हापासून बनविलेला ब्रेड अधिक हेल्दी असतो असे म्हणतात. याचे कारण असे की, त्यामध्ये कॅलरीजच्या तुलनेत फॅटचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे हा ब्रेड तुम्हाला ऊर्जा देतो. याची चव तुम्हाला फार खास लागणार नाही.

परंतु त्यासोबत तुम्ही अंडी किंवा इतर काही गोष्टी खाल्ल्या तर त्या पोटभरीच्या होतात. दिवसातून २ स्लाइस तुमच्यासाठी पुरेशा आहेत. लहान मुले किंवा ज्येष्ठांनी ब्राऊन ब्रेडचे सेवन करावे कारण त्यातून मिळणारे कॅल्शिअम हाडांच्या बळकटीसाठी आणि इतर गोष्टींसाठी आवश्यक असते. इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड आपण वापरू शकतो.

व्हाईट ब्रेड मैद्यापासून बनलेला असतो. मैदा हा आरोग्यासाठी चांगला नाही, हे खरे असले तरी व्हाईट ब्रेड शरीरासाठी इतका घातक नाही. गव्हापासूनच मैदा तयार होतो. काही जणांच्या मते व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेडमध्ये फारसा फरक नाही.

याच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. व्हाईट ब्रेडमध्ये १० टक्के जास्त कॅल्शिअम, आर्यन, मॅग्नीझ असते. यामध्ये फॅट आणि साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हा ब्रेड खाण्यापूर्वी आरोग्याचा विषय जरूर लक्षात घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com