Digital Detox Before Bed: झोपण्याच्या तासभर आधी मोबाइल का ठेवावा दूर? मेंदूतज्ज्ञ देतात सोपे आणि परिणामकारक उपाय

Why Mobile Should be Avoided Before Sleep: झोपेपूर्वी मोबाइल वापरणं टाळल्यास झोप आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं; तज्ज्ञांनी दिले सोपे उपाय.
Why Mobile Should be Avoided Before Sleep
Why Mobile Should be Avoided Before Sleepsakal
Updated on

थोडक्यात:

  1. मोबाइलचा अतिवापर एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश, चिडचिडेपणा व वर्तनातील बदल निर्माण करतो.

  2. मुलांपासून प्रौढांपर्यंत सवयीचे व्यसन आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

  3. झोपेच्या आधी किमान एक तास मोबाइल वापरणं टाळावं, असा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आहे.

How Mobile Affects Brain Health and Sleep: मोबाइलचा अतिवापर आणि गैरवापर मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, वर्तणुकीशी संबंधित समस्या, सवय आणि व्यसन यासारख्या समस्या निर्माण करू शकतात. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाइलचा वापर थांबवावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी दिला.

जागतिक मेंदू सप्ताहनिमित्ताने नागपूर न्यूरो सोसायटीच्यावतीने ‘सर्व वयोगटातील लोकांसाठी मेंदूचे आरोग्य’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. डॉ. भावे यांनी सामाजिक संपर्क, चांगले मित्र आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ताणतणाव हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. परंतु ताण कमी करणे, सकारात्मक विचार करणे, ध्यान आणि योगाचा सराव करणे याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

झोपेची अनेक महत्त्वाची कार्ये आहेत. स्मरणशक्ती सुधारणे, भावनिक संतुलन राखणे, सर्जनशीलता, रक्तदाब नियंत्रित करणे, इन्सुलिन संवेदनशीलता, चरबी साठवणे आणि वितरण इत्यादींसाठी ती अनिवार्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Why Mobile Should be Avoided Before Sleep
Early Age Alzheimer Signs: ‘सैयारा’मधल्या वाणीसारखं तुम्हालाही २०व्या वर्षीच विसरायला होतंय? असू शकतात अल्झायमरची सुरुवातीची लक्षणं! वेळीच ओळखा!

छंदांसह कुटुंबासाठी वेळ द्यावा

दिवसातील ३० टक्के वेळ आपल्या छंदांसाठी, आपल्या आवडीच्या क्षेत्रांसाठी आणि कुटुंबासाठी राखीव ठेवावा, असे जागतिक न्यूरॉलॉजी फेडरेशनचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले. त्यांनी असे सुचवले की, सर्व प्रकारची साखर टाळावी, पॅकेज्ड आणि जंक फूड टाळावे, ट्रान्स फॅट्स टाळावेत. सिस्टिसकोसिससारख्या आजारांना रोखण्यासाठी सॅलड चांगले स्वच्छ करून खाणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.

शहरी लोकसंख्येला योग्य झोप मिळत नाही

झोप ही आरोग्यासाठी पोषक जैविक देणगी आहे. असा अंदाज आहे की, जगातील ७० टक्के सुसंस्कृत शहरी लोकसंख्येला योग्य झोप मिळत नाही. या ''आवश्यकता-अमिळकता’ मध्ये मोठे योगदान म्हणजे झोपेच्या वस्तुनिष्ठ फायद्यांबद्दलच्या जागरूकतेची कमी, कामाचा ताण, सामाजिक बांधिलकी आणि काम आणि मनोरंजनाच्या डिजिटलायझेशनचा व्यापक प्रभाव असल्याचे मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलचे डॉ. जॉय देसाई यांनी सांगितले.

Why Mobile Should be Avoided Before Sleep
Household Chemicals Harm Brain Health : बाम, टूथपेस्ट, केसांचं तेल ठरतंय मेंदूसाठी घातक? तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा!

FAQs

  1. झोपेआधी मोबाइल वापर टाळावा का? (Should mobile phone use be avoided before sleep?)
    होय. झोपण्याआधी किमान एक तास आधी मोबाइल वापरणं बंद करणं गरजेचं आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांच्या मते, मोबाइलचा प्रकाश आणि वापरामुळे मेंदूची विश्रांती प्रक्रिया बिघडते, ज्यामुळे निद्रानाश आणि झोपेची गुणवत्ता कमी होते.

  1. मोबाइलच्या अतिवापरामुळे कोणत्या आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात?(What health issues can arise due to excessive mobile phone use?)
    मोबाइलच्या अतिवापरामुळे एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, वर्तनातील बदल, व्यसनाधीनता आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे लक्षणे लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्येही दिसून येतात.

  1. मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी कोणत्या सवयी उपयुक्त आहेत? (What habits are helpful for maintaining brain health?)
    मेंदूचं आरोग्य टिकवण्यासाठी ध्यान, योग, सकारात्मक विचार, सामाजिक सहभाग, चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवणं, छंद जोपासणं आणि कुटुंबासाठी वेळ देणं या सवयी उपयुक्त ठरतात. तज्ज्ञांच्या मते ताण कमी करणं आणि संतुलित जीवनशैली अंगीकारणं महत्त्वाचं आहे.

  1. योग्य झोप का आवश्यक आहे आणि ती मिळत नसल्याने काय परिणाम होतो? (Why is proper sleep essential and what are the consequences of not getting it?)
    झोप स्मरणशक्ती सुधारते, भावनिक संतुलन राखते, सर्जनशीलता वाढवते, रक्तदाब व इन्सुलिन नियंत्रणात ठेवते, आणि शरीरातील चरबीचं योग्य प्रमाण राखते. मात्र, झोपेचा अभाव असल्यास या सर्व बाबींवर विपरीत परिणाम होतो. शहरांमध्ये राहणाऱ्या अनेकांना कामाचा ताण, डिजिटल व्यत्यय आणि जागरूकतेच्या अभावामुळे पुरेशी झोप मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com