तुम्हालाही दुपारी झोपायची सवय आहे का? मग हे वाचाच.. | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

healthy lifestyle

तुम्हालाही दुपारी झोपायची सवय आहे का? मग हे वाचाच..

अनेकजणांना दिवसा झोपायची सवय असते.अनेकजण घरकाम आटोपल्यानंतर दिवसाची झोप घेतात तर काही थकवा नाहीसा करण्यासाठीही दिवसा झोपतात. पण तुम्हाला माहिती आहे का दिवसा झोपायची सवय आपल्यासाठी चांगली आहे की वाईट? चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Health: शरीरातील अशक्तपणा घालवण्यास दूध आणि पनीर गुणकारी

  • डॉक्टर सहसा दिवसा झोपणे चुकीचं असल्याचं सांगतात. पण अनेकदा रात्रीची अपुर्ण झोप झाल्याने दिवसा झोप येते. पण आयुर्वेदानुसार दिवसा झोपणे चुकीचं आहे.

  • अनेक शारिरीक आजार निर्माण होण्याची शक्यता वाढते. कफ पित्त्यांचा त्रास असणाऱ्या लोकांनी दिवसा कधीही झोपू नये.

  • सोबतच लठ्ठ किंवा जास्त वजनाने ग्रस्त असलेल्या लोकांनीही दुपारचे झोपणे टाळावे. यामुळे वजन वाढण्याची शक्यता आणखी वाढते.

हेही वाचा: Health: नव्या Covid केसेसमध्ये 'ही' आहे महत्वाची लक्षणे, 'अशी' घ्यावी काळजी; वाचा डॉक्टरांचा सल्ला

  • एवढंच काय तर दिवसा झोपल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीरात सुस्ती येते त्यामुळे शरीरात आळसपणा येतो.

  • आयुर्वेदानुसार दिवसा झोपण्यापेक्षा दुपारची १५ मिनिटांची झोप शरिरासाठी चांगली असते. पण त्यापेक्षा जास्त वेळ कधीच झोपू नये.

Web Title: Do You Have Habit Of Sleeping Daytime Read Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..