Health Tips : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात! | Dont do fasting empty stomach to lose weight health tips dieting habits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss
Health Tips : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात!

Health Tips : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात!

वजन वाढल्यानंतर शरीराचा आकार विचित्र होतो. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. आपली खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत आहेत. सामान्यत: अनेकांना जास्त खाण्याची सवय असते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. पण जेव्हा तेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अचानक ते खाणं पूर्णपणे कमी करतात.

पण उपाशी राहणं शहाणपणाचं नाही, त्यामुळे आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्ही उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही एक मोठी चूक ठरू शकते कारण असं केल्यानं तुमच्या शरीरात अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता होऊ लागते.

जास्त वेळ काहीही न खाल्ल्याने किंवा न पिल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ लागते, ज्यामुळे तुमची त्वचा निर्जीव दिसू लागते. त्यामुळे तुमच्या एकूण सौंदर्यावर वाईट परिणाम होतो. पोट आणि कंबरेची चरबी कमी होईल असं वाटतं, पण या प्रक्रियेत तुम्ही स्वतःचे शरीर कमकुवत करत आहात, अशी चूक कधीही करू नका. (Health Tips)

जास्त उपवास केल्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यानंतर शरीराच्या अनेक कार्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

जास्त वेळ अन्न न खाल्ल्यास शरीरातील चयापचय क्रिया बिघडते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

जे लोक जास्त वेळ काहीही खात नाहीत, त्यांचा रक्तदाब खूप कमी होतो, त्यामुळे अशी चूक न केलेलीच बरी.

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी फायबर भरपूर असलेले पदार्थ खाणे चांगले. या पदार्थांमध्ये फायबर असतात ज्यामुळे पचन मंद पण चांगलं होतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरात पाण्याची कमतरता कधीही होऊ देऊ नये, नाहीतर पोटाला त्रास होतो.

टॅग्स :diet plandiet tipshealth