Women Health
Women Healthesakal

Women Health : हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी महिलांनी रिकाम्या पोटी या 3 चमत्कारी पानांचे सेवन करावे

सकाळी रिकाम्या पोटी काही पानांचे सेवन केल्याने हार्नोन नियंत्रित राहतात

Leaves For Hormone Control : काही महिलांना वेळेवर मासिक पाळी न येण्याचा त्रास असतो. मात्र हल्ली हा त्रास महिलांमध्ये फार सामान्यपणे दिसून येतो. पोटात दुखणे, मूड स्विंग होणे यांसारखे लक्षणं तुमचे हार्मोन नियंत्रित नसल्याचा इशारा देतात. तुमचे हार्मोन्स दीर्घकाळ असंतुलित राहिल्यास तुम्हाला थायरॉइड, पीसीओस यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे तर महिलांना गर्भधारणेच्या वेळीसुद्धा समस्या येऊ शकतात. मात्र यावर उपाय काय? हार्नोन नियंत्रित कसे ठेवायचे? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.

अनेकांना माहिती नाही, मात्र सकाळी रिकाम्या पोटी काही पानांचे सेवन केल्याने हार्नोन नियंत्रित राहतात. तसेच या पानांचे सेवन केल्यास महिलांना आरोग्यासंबंधित अनेक फायदे होतील. चला तर डायटिशीयनकडून याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

हार्नोन्स संतुलित ठेवण्यासाठी महिलांनी या ३ पानांचे सेवन करावे

1) तुळशीची पानं

तुळशीच्या पानांत अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच ही पानं महिलांना त्यांची इम्युनिटी बूस्ट करायलाही मदत करतात. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने शांत वाटतं तसेच शरीरावरील सूजन कमी होण्यासही मदत होते.

असे करा तुळशीच्या पानांचे सेवन

तुळशीच्या पानांचा सगळ्यात सोपा उपाय करायचा झाल्यास रोज सकाळी तुळशीच्या पानांचा चहा पिणे. सकाळी दूधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीच्या पानांचा चहा प्या. यासाठी एका पातेल्यात 200 ml पाणी आणि त्यात तुळशीची पानं उकळवा. पाणी चांगल्या प्रकारे उकळल्यानंत त्यात थोडे मध घालून तुम्ही हा चहा पिऊ शकता.

Women Health
Women Health

2) कडी पत्ता

उत्तम ब्लड सर्क्युलेशनसाठी कडी पत्ता फार फायद्याचा आहे. यात फोलिक अॅसिडसह अनेक अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील हार्नोन्स संतुलित राहातात. महिलांना उद्भवणाऱ्या अनेक समस्या कडी पत्त्याचे सेवन केल्याने दूर होतात.

असे करा कडी पत्त्याचे सेवन

सकाळी रिकाम्या पोटी ४-५ कडी पत्त्याची पानं पाण्यात धुवून घ्या आणि चावून खा. याशिवाय तुम्ही 200ml पाण्यात कडी पत्त्याची ८-१० पान उकळवून या पाण्यचे सेवनही तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही कडी पत्ता बारीक करून त्याचा अर्क पाण्यात मिसळूनसुद्धा पिऊ शकता. (Lifestyle)

Women Health
Women's Health : महिलांनो, शरीरातले हे छोटे छोटे बदल पडू शकतात महागात! आजच घ्या डॉक्टरांचा सल्ला...

3) कोथिंबीर (Coriander Leaves)

शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर काढण्यासाठी कोथिंबीरचे पाणी हे एक नॅचरल डिटॉक्स ड्रिंक मानले जाते. याचे सेवन महिलांसाठी फार फायद्याचे असते. यामुळे शरीरातील इंसुलिन नियंत्रित राहाते आणि तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. (Women Health)

असे करा सेवान

200 ml पाण्यात एक मुठ कोथिंबीर, एक चमचा लिंबाचा रस काही चिमुटभर काळे मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर हा ज्यूस प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com