Down Syndrome : वेळीच उपचार, डाऊन सिंड्रोमवर मात, ९२० बालकांपैकी एकास भारतामध्ये बाधा

Down Syndrome : डाऊन सिंड्रोम हा गुणसुत्रांमधील दोषांमुळे निर्माण होणारा जन्मजात आजार आहे.
Down Syndrome : वेळीच उपचार, डाऊन सिंड्रोमवर मात, ९२० बालकांपैकी एकास भारतामध्ये बाधा
esakal

अहमदनगर : डाऊन सिंड्रोम हा गुणसुत्रांमधील दोषांमुळे निर्माण होणारा जन्मजात आजार आहे. आपल्या शरीरामध्ये २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात, हा आजार २१ व्या गुणसुत्रावर जोडी ऐवजी ३ गुणसूत्रे आल्याने निर्माण होतो.

डाऊन सिंड्रोमचे वर्णन जॉन लॅंगडन हेडॉन डाऊन यांनी १८६६ मध्ये प्रथम केले होते. १९५९ मध्ये लेझ्यून यांनी या डिसऑर्डरचा गुणसूत्र आधार शोधला होता. डाऊन सिंड्रोम हा आजार भारतात जवळजवळ ९२० पैकी एका जन्मलेल्या बालकाला असू शकतो. २०२४ ची डब्लूएचओने डाऊन सिंड्रोमसाठी थीम सांगितली आहे. ‘आमच्याशी बोला आणि साचेबंद समज दूर करा’.

या आजाराची मुले ओळखण्यासाठी चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, सपाट चेहरा, दोन डोळ्यांमध्ये अजून एक डोळा मावेल एवढे अंतर, नाकाचा सपाट पूल, वरच्या पापणीजवळ असलेली त्वचेची घडी, नाकापासून कानापर्यंत पट्टी लावल्यास सामान्यतः एक तृतीयांश कान या रेषेच्यावर, तर दोन तृतीयांश कान रेषेखाली असतो.

परंतु डाऊन सिंड्रोममध्ये संपूर्ण कान या रेषेच्या खाली असतो. लहान तोंड, जीभ, उंच कमानी टाळू, प्रथम आणि द्वितीय बोटे दरम्यान विस्तृत अंतर, शिथिल स्नायू आणि बौद्धिक दोष अशी या आजारांची लक्षणे असतात. या मुलांची वाढ उशिरा नोंदविली जाते.

कशामुळे होतो आजार ?

नात्यातील लग्न, मागील गर्भपात, औषधे आणि रसायनांचा पालकांशी संपर्क, तंबाखू आणि वडिलांकडून अल्कोहोलचा वापर हे डाऊन सिंड्रोमसाठी धोकादायक घटक असल्याचे दिसून आले. आईचे वय ३५ पेक्षा जास्त असेल, तर दर ८० जन्मामागे एक मुल डाऊन सिंड्रोमचे असते. हा आजार नवीन तंत्रज्ञानाने आता गर्भ १२ आठवड्यांचा असताना ओळखता येतो.

डाऊन सिंड्रोम या आजाराची बरीच मुले लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती दिल्यामुळे वेगळे करिअर करतात. व्यवहारात यशस्वी झालेली माझ्या पाहण्यात आहेत. या मुलांना शाळेत वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागते. त्यांना जेथून समजेल तेथून सुरुवात करावी लागते. २०१६ च्या दिव्यांग कायद्यानुसार या मुलांना परीक्षेत पहिलीपासून ते बारावीपर्यंत सवलती मिळतात.

- डॉ. सुचित तांबोळी, बालविकास व बालरोग तज्ज्ञ

Down Syndrome : वेळीच उपचार, डाऊन सिंड्रोमवर मात, ९२० बालकांपैकी एकास भारतामध्ये बाधा
White Lung Syndromes : चीनमध्ये धुमाकूळ घालणारा व्हाईट लंग सिंड्रोम 'हा' आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com