मनाची शक्ती : व्हिटॅमिन्स वाढवतात बुद्ध्यांक

बुद्धीला चालना देऊन तिचे कार्य अधिक गतिमान व्हावे यासाठी आणि बुद्ध्यांकवाढीसाठी आपल्या आहारात चार महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सचा (जीवनसत्त्वे) समावेश करणे आवश्‍यक आहेत.
Vitamin
VitaminSakal

- डॉ. हंसा योगेंद्र

बुद्धीला चालना देऊन तिचे कार्य अधिक गतिमान व्हावे यासाठी आणि बुद्ध्यांकवाढीसाठी आपल्या आहारात चार महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सचा (जीवनसत्त्वे) समावेश करणे आवश्‍यक आहेत. ती व्हिटॅमिन्स कोणती आणि त्यामुळे काय फायदा होतो, हे जाणून घेऊया.

व्हिटॅमिन बी

‘व्हिटॅमिन बी’मुळे बुद्धीचे आरोग्य नीट राहते. मेंदू अधिक दक्ष राहतो. पालक, केळी, बटाटे, धान्य, मसूर आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमिन बी’चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या पदार्थांच्या नियमित सेवनाने भरपूर फायदा होतो. ‘व्हिटॅमिन बी-६’ मुळे मेंदूतील विविध क्रिया गतिमान होण्यास मदत होते. ‘व्हिटॅमिन बी-३’, ‘बी-९’ आणि ‘बी-१२’ मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या पोषणासाठी आवश्यक आहे. ‘व्हिटॅमिन बी’ची कमतरता असल्यास नवे काही शिकण्यात रस वाटत नाही आणि एकाग्रताही साधता येत नाही.

व्हिटॅमिन सी

‘व्हिटॅमिन सी’चा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो. त्यामुळे हे व्हिटॅमिन बहुगुणी मानले जाते. मोसंबी, लिंबू, किवी, पपई, स्ट्रॉबेरी अशा विविध फळांमध्ये आणि विशेषतः आंबट चवीच्या फळांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण जास्त असते. सलग सहा महिने रोज एक पेलाभर संत्र्याच्या रस घेतला तर, बुद्ध्यांकात वाढ होते असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. वृद्ध व्यक्तींची स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही या व्हिटॅमिनचा उपयोग होतो.

व्हिटॅमिन डी

पालक, भेंडी आणि सोयाबीनमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ आढळते. मज्जातंतूंचे कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी आणि बुद्ध्यांकात वाढ होण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’चे सेवन करणे आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते आणि हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता टाळण्यासाठी रोज सकाळी कमीतकमी ३० मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात बसा.

व्हिटॅमिन ई

‘व्हिटॅमिन ई’ मेंदूबरोबरच पेशींच्या विकासासही मदत करते. त्यामुळे बुद्ध्यांक वाढतो. शेंगदाणे, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, वनस्पती तेल, पालक-भोपळा यासारख्या भाज्यांमध्ये ‘व्हिटॅमिन ई’चे प्रमाण जास्त असते. ‘व्हिटॅमिन ई’ चरबी-विरघळवणारे अँटिऑक्सिडेंट म्हणूनही काम करते. त्यामुळे मेंदूवरील अतिरिक्त ताण कमी होतो आणि रक्तपुरवठा सुरळीत होण्यासही मदत होते.

मल्टिव्हिटॅमिन पेय

विविध व्हिटॅमिन्सचा वापर करू तयार केलेले हे पेय तुम्ही नाश्‍त्याच्या वेळी घेऊ शकता. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. त्यासाठी १ वाटी पपईचे तुकडे, १ वाटी डाळिंबाचे दाणे, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा सूर्यफुलाच्या बियांची पावडर आणि साधारणतः १५० मिलिलीटर दूध घ्या. हे सर्व घटक मिक्सरमध्ये एकत्र करा. त्यावर आवडीनुसार सूर्यफुलाच्या बियांची पावडर टाका.

हे आरोग्यदायी पेय तुम्ही रोज सकाळी घेतल्यास अनेक फायदे दिसून येतील. यातील लिंबू आणि पपईमुळे ‘व्हिटॅमिन सी’ मिळते. दूध आणि सूर्यफूल बियांमुळे ‘व्हिटॅमिन बी’ची कमतरता भरून निघते आणि डाळिंबामुळे ‘व्हिटॅमिन के’ मिळते. अशा प्रकारे व्हिटॅमिन्सच्या नियमित आणि प्रमाणबद्ध सेवनामुळे बुद्धी तजेलदार होण्यास व शरीर निरोगी होण्यास मदत होऊ शकते, हे आपल्या लक्षात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com