वसा आरोग्याचा : स्तनपानासाठी संतुलित आहार

आपण गेल्या भागात स्तनपानाचे महत्त्व लक्षात घेतले. आपण त्यासाठीचा आहार काय असावा, याची माहिती घेऊयात.
breastfeeding
breastfeedingsakal

- डॉ. कोमल बोरसे

आपण गेल्या भागात स्तनपानाचे महत्त्व लक्षात घेतले. आपण त्यासाठीचा आहार काय असावा, याची माहिती घेऊयात.

पूरक आहार

अनेक महिला रोज आवश्यक तेवढा आहार वेळच्या वेळ घेत नाहीत. प्रसूतीनंतर स्वतःकडे तेवढं लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पूरक आधार घ्यावा लागतो. स्तनपान करताना पोषणतत्त्वाची मागणी वाढत असल्यामुळे जीवनसत्त्वे आणि प्रथिनांची आवश्यकता असते. स्तनपानादरम्यान कोणतेही औषध, हर्बल पावडर घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पोषक आहाराअभावी पुरेसे दूध बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल, अशी अनेक महिलांमध्ये धास्ती असते.

परंतु ती नैसर्गिक प्रक्रिया असल्याने चिंता करू नये. भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. स्तनपान करताना द्रवपदार्थाची गरज वाढलेली असते. पुरेसे द्रव न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. घरातील प्रत्येक खोलीत पाण्याची बाटली ठेऊन पिण्याची आठवण केली पाहिजे. स्तनपान करतात त्या ठिकाणी पाण्याचा कप असावा. उंची, वजन, वय दिनचर्या आणि स्तनपानाच्या स्थितीनुसार आहारतक्ता बनवणे आवश्यक आहे.

कोणते पदार्थ टाळावेत

गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत याची आपल्याकडे मोठी यादी आहे. काय खाल्ले पाहिजे याच्यावर कुणाचे लक्ष नसते त्यामुळे पोषण कमी मिळते हीच गोष्ट स्तन्यपानातही केली जाते. स्तनपान करणाऱ्या महिलांनी पूर्णपणे टाळावेत अशा खाद्यपदार्थांची यादी नाही. त्याऐवजी त्यांनी आरोग्यदायी अन्न खावे आणि त्यांच्या शरीरातील लक्षणांकडे लक्ष द्यावे.

पोषण आहारासाठी

  • सीफूडचा वापर मर्यादित करावा.

  • कॅफिनचा बाळावर कसा परिणाम होतो याकडे लक्ष देणे.

  • स्तनपान करणारी महिला कॉफी पिते तेव्हा बाळाला आईच्या दुधात कॅफिनचा अतिशय लहान डोस मिळतो. हे त्याच्या झोपेवर परिणाम करण्यासाठी पुरेसे असू शकतो.

  • बाळाला त्रास होत नसल्यास मसालेदार खाऊ शकता.

  • स्तनपान करताना अल्कोहोल टाळावे. कार्बोनेटेड शीतपेय पिऊ नये.

  • अजिनोमोटो असणारे पदार्थ खाऊ नयेत.

आईच्या दुधाचा पुरवठा वाढवणारे काही पदार्थ आहेत का, याची यादी अनेक जण मागतात. यामध्ये मेथीचे दाणे, शतावरी, हळीव, लसूण, दूध, बदाम, पाणी यांचा समावेश होतो. स्मूदीज तयार करणे सोपे आणि पौष्टिकदृष्ट्या दाट असतात. स्तनपानाचे पहिले आठवडे मागणीचे असू शकतात. प्रसूती झाल्यानंतर झोप न लागणे आणि नवजात बाळाची काळजी घेण्याच्या भावनिक मागण्यांचा सामना करावा लागतो. यासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाचा आहे.

यासाठी खालील आहार पदार्थ मदत करू शकतात

  • फळे आणि भाज्या वापरून सकाळी स्मूदी पिणे.

  • सुकवलेले बेरी, मनुके, अंजीर एकत्र करून स्मूदी बनवणे.

  • अधिक कॅलरीसाठी पाण्याऐवजी दूध किंवा दही वापरावे.

  • दिवसा काजू आणि इतर सुकामेवा खावा.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com