वसा आरोग्याचा : गुळाचे नियंत्रित सेवन

ॲनिमिया झालेले अनेक लोकं गूळ घालून केलेले लाडू खातात, परंतु साखरेपेक्षा गुळामध्ये लोह आहे. फक्त २.६४ मिलिग्रॅम लोह मिळवण्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम गूळ खावा लागेल.
वसा आरोग्याचा : गुळाचे नियंत्रित सेवन

- डॉ. कोमल बोरसे

ॲनिमिया झालेले अनेक लोकं गूळ घालून केलेले लाडू खातात, परंतु साखरेपेक्षा गुळामध्ये लोह आहे. फक्त २.६४ मिलिग्रॅम लोह मिळवण्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम गूळ खावा लागेल. एवढा गूळ खाणं शक्य नाही आणि ते आरोग्यासाठी हानिकारकदेखील ठरेल. त्यामुळे ॲनिमियामध्ये गूळ खाणे हा पर्याय तितका व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. एवढे लोह आपल्याला अन्य पदार्थातून सहज मिळू शकते. मग तो मांसाहार असो की, शाकाहार; तेही खूप कमी मात्रा खाल्ल्यानंतर.

मागील भागात १०० ग्रॅम उसाचा रस किंवा साखर किंवा गूळ यामध्ये किती पोषणतत्त्व आहे, त्याची माहिती घेतली. त्यामध्ये उसाच्या रसामध्ये कमी ऊर्जा म्हणजे कॅलरीज आहेत, कारण उसाच्या रसामध्ये पाण्याचा अंश जास्त प्रमाणात असतो. त्यानंतर साखरेमध्ये खूप कमी पाण्याचा अंश असतो. त्यामुळे साखरेमध्ये गुळापेक्षा पंधरा कॅलरी जास्त असतात.

उसाच्या रसात लोहाचे प्रमाण किंचित असते, परंतु गुळामध्ये ते २.६४ मिलिग्रॅम आहे. परंतु, तेवढ्यासाठी आपल्याला १०० ग्रॅम गूळ खावा लागेल व हे प्रमाण खूप जास्त आहे आणि शंभर ग्रॅम गूळ खाल्यावर इतर आजारांना निमंत्रण मिळू शकते. परंतु २.६४ मिलिग्रॅम लोह इतर गोष्टींमधून सहज मिळू शकते, जसे की शाकाहारामध्ये सर्व पालेभाज्या. सर्वांत जास्त सुकलेला पुदिना, शेवग्याचा पाला, गव्हांकुराचा पाला, बिटाचा पाला आणि मांसाहार.

परंतु लोहयुक्त आहार खाताना त्यासोबत व्हिटॅमिन-सी सोबत गेले पाहिजे. त्यासाठी तुम्ही लिंबू किंवा कोणतेही आंबट फळ खाऊ शकता. तसे नाही केल्यास रक्तामध्ये लोह शोषले नाही जाणार. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा उपयोग होणार नाही.

सारांश, गूळ आवडत असेल तर थोड्याफार प्रमाणात जरूर खावा. त्यामध्ये लोह आहे. हिमोग्लोबिन वाढेल या आशेने खाऊ नये. साखरेपेक्षा गूळ निश्चितच बरा आहे, परंतु भारतातून सगळ्यात जास्त गूळ निर्यात होतो आणि आवक वाढल्यामुळे गूळदेखील आता साखरेप्रमाणे मोठ्या कंपनीमध्ये बनतो. आणि अशा कंपन्यांमध्ये लोखंडी भांडी वापरली जात नाहीत, तर स्टील वापरला जातो. बाजारात जो गूळ मिळतो, त्यामध्ये तेवढे पोषण राहिलेले नाही.

मात्र, कॅलरी तशाच आहेत. त्यामुळे शेजारच्यांनी सांगितले, कुठेतरी पाहिले, वाचले म्हणून कोणतीही कृती करू नये. त्याआधी शहानिशा करावी. बोलणारी व्यक्ती आपले नातेवाईक, मैत्रिणी, मित्र आहे म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नये. ती कोणत्या विषयात तज्ज्ञ आहे, हे तपासून बघावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com