आजारा... आल्या पावली परत जा...

योग्य उपचारपद्धती कशी निवडावी? अशा सर्व बाबतीत शास्त्रशुद्ध माहिती मिळून तुम्हाला जुनाट आजारांवर मुळापासून विजय मिळवायला मदत होणार आहे!
food health
food healthsakal

- डॉ. मृण्मयी मांगले, Chronic disease reversal expert

आपल्याला कोणताही जुनाट आजार झाला, की पहिला प्रश्न मनात येतो, आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागतील का किंवा शस्त्रक्रिया करावीच लागेल का? हे टाळण्यासाठी आपण आहारात बदल करू पाहतो. मित्राच्या सल्ल्याने होमिओपॅथी, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जातो. निसर्गोपचाराचे नियम पाळतो. कधी कधी अक्युपंक्चर करून घेतो, योग सुरू करतो, परंतु यातील काय, कसं आणि कोणत्या प्रमाणात खरंच फायद्याचं आहे?

योग्य उपचारपद्धती कशी निवडावी? अशा सर्व बाबतीत शास्त्रशुद्ध माहिती मिळून तुम्हाला जुनाट आजारांवर मुळापासून विजय मिळवायला मदत होणार आहे! किती बरं झालं असतं, आपल्याला आजारांना आल्या पाऊली परत पाठवता आलं असतं. आपण खरंच झालेला आजार शरीराच्या आणि मनाच्या बाहेर काढून टाकू शकतो का? याचं उत्तर लेखमालेत आपण मिळून शोधूया!

आरोग्य-आजार-लक्षणाचे त्रिकूट

आरोग्याची सुस्थिती प्राप्त करण्यासाठी हे त्रिकुट समजून घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्यपूर्ण स्थिती ढासळली की होतो तो रोग आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरात होणारे (बहुतांश वेळी) त्रासदायक बदल म्हणजे लक्षणं!

१) स्वास्थ्य/आरोग्य - आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा, दुखण्याचा अभाव नसून शारीरिक, मानसिक व भावनिक कल्याणाची व संतुलनाची स्थिती आहे. यात शारीरिक क्षमता, मानसिक व भावनिक स्थिरता महत्त्वाची आहे. शारीरिक स्तरावर शरीराची रचना, शारीरिक क्रिया व जीवरासायनिक प्रक्रिया हे सामान्य व संतुलित असणे म्हणजे आरोग्य. मानसिक व भावनिक आरोग्य हे बाह्य परिस्थितीबरोबर सुसंगतपणे जुळवून घेऊन योग्य प्रतिक्रिया व्यक्त करण्याची क्षमता, जीवनातील नेहमीच्या व काही वेळा कसोटीच्या प्रसंगांना योग्य प्रकारे तोंड देण्याची क्षमता, चांगली उल्हासपूर्ण अवस्था अनुभवणे, सुदृढ नातेसंबंध बनवून ते टिकवू शकण्याची क्षमता असणे, नवे स्किल अंगीकारून कामामध्ये मन लावून योग्य योगदान देणे आदी अनेक गोष्टी समाविष्ट आहेत.

२) रोग/आजार - बाहेरील किंवा अंतर्गत कारणांच्या अनिष्ट प्रभावामुळे शरीराची असामान्य स्थिती निर्माण होते. ती शरीराची रचना, क्रिया व रासायनिक प्रक्रिया यामध्ये बिघाड निर्माण करते त्याला रोग म्हणतात. (उदा ः मधुमेह)

३) लक्षणे - लक्षणे किंवा चिन्ह म्हणजे रोगाव्यवस्थेत शरीरांतर्गत रचनेत किंवा क्रियांमध्ये उद्‍भवणारे बदल. (उदा : मधुमेहात सतत तहान लागणे, सतत लघवी, अति प्रमाणात खा-खा होणे, थकवा येणे)

सोपा प्रश्न - माझ्या सगळ्या तपासण्या नॉर्मल आहेत. डॉक्टरांनी कोणत्याही आजाराचे निदान केलेलं नाही, परंतु माझे सतत वाद होतात, चिडचिड होते, सकाळी जाग आल्यावर उल्हासपूर्ण वाटत नाही, खाण्यावर ताबा नाही, तर माझे आरोग्य सुस्थितीमध्ये आहे का? याचे उत्तर आपण पुढच्या लेखामध्ये पाहूया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com