आरोग्यमंत्र : रक्तशर्करा तपासणीचे महत्त्व

रक्तातील साखर तपासणी हा मधुमेहाचे नियमन करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. त्याबाबतची माहिती घेऊ या.
blood glucose testing
blood glucose testingsakal

- डॉ. सिंपल कोठारी

रक्तातील साखर तपासणी हा मधुमेहाचे नियमन करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. त्याबाबतची माहिती घेऊ या.

रक्तातील साखरेची तपासणी का करावी?

मधुमेह झालेल्या व्यक्तीने रक्तातील साखरेची तपासणी नियमित करायलाच हवी. तुमच्यावर सध्या सुरू असलेले उपचार किती प्रभावी ठरू शकतात, हे शोधण्यासाठी रक्तातील साखरेचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: तुम्ही इन्शुलिन वापरत असल्यास त्याचा डोस ठरवण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची ठरते. अनेक गोष्टी तुमच्या रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, खालील काही गोष्टीमुळे साखर वाढू शकते -

  • कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ

  • औषध चुकवणे

  • इन्शुलिन न घेणे

  • व्यायाम न करणे

  • ताण-तणाव, आजारपण

  • स्टिरॉइड किंवा इतर औषधे

साखर तपासणीच्या पद्धती कोणत्या?

  • रक्तवाहिनीतून रक्त घेऊन त्याची तपासणी लॅबमध्ये केली जाते.

  • ग्लुकोज मीटरवर ‘फिंगर स्टिक’च्या साह्याने रक्तवाहिन्यांच्या रक्तातील शर्करा फक्त एका थेंबातून तपासली जाते आणि लगेच आपल्याला कळते. त्यामुळे विशेषत: इन्शुलिन घेणाऱ्या लोकांना या पद्धतीचा वापर करून दिवसातून अनेक वेळा साखर तपासता येते.

  • सीजीएमएस - २४ तास तुमच्या ग्लुकोजच्या पातळीचे मोजमाप करणारे हे उपकरण असते. ते सेन्सरद्वारे तुम्हाला आलेखचित्र उपलब्ध करून देते. हे उपकरण त्वचेखालच्या स्तरांतील (इंटरस्टिशिअल) साखर मोजते. याद्वारे १०-१५ दिवसांचा आलेख कळू शकतो.

वारंवार तपासणी कोणी करावी?

नियमितपणे रक्तातील साखरेची तपासणी करून निरीक्षणे नोंदवल्याने खालील प्रकारच्या लोकांना फाय‌दा होऊ शकतो -

  • इन्शुलिन घेणारे

  • गर्भवती स्त्रिया

  • आजारी व्यक्ती

  • साखर सतत कमी असलेल्या व्यक्ती

  • शस्त्रक्रिया करण्यापूर्वी व नंतर

साखर कमी-जास्त झाल्याची लक्षणे कोणती?

साखरचे प्रमाण साधारणत: ७० एमजी/डीएलपेक्षा कमी असते तेव्हा ती कमी आहे, असे मानले जाते. साखर कमी असल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, खूप भूक लागणे, अंग थरथरणे, घाम येणे, भीती वाटणे अशी लक्षणे जाणवतात. साखरेचे प्रमाण जेव्हा २०० एमजी/डीएलपेक्षा जास्त असते, तेव्हा साखर जास्त झाली आहे, असे सामान्यतः म्हटले जाते.

साखरेची तपासणी केव्हा करावी?

  • सकाळी उठल्यावर उपाशीपोटी

  • जेवणापूर्वी (तुम्ही इन्शुलिन घेत असल्यास) आणि जेवणानंतर किमान २ तासांनी.

  • व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर.

  • झोपण्यापूर्वी. कारण झोपेत साखर कमी होत असेल, तर झोपेत तुम्हाला कोणतीही लक्षणे जाणवणार नाहीत. याउलट साखर जास्त झाल्यास गाढ झोप लागण्याची शक्यता आहे. असे दीर्घ काळ झाल्यास त्याचा इतर अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतो.

कोणती काळजी घ्यावी?

तपासणीआधी हात स्वच्छ धुवावा आणि नंतर कोरडा करावा. नवीन टाचणीने बोटातील रक्त घ्यावे. ते पुरसे आहे का, हे पाहूनच ‘फिंगर स्ट्रिप’ला स्पर्श करावा. तपासणीचा निकाल हाती आल्यावर ती स्ट्रिप टाकून द्यावी. टाचणीने वारंवार टोचल्याने बोटाला दुखापत होत असल्याने मध्यभागी न टोचता बाजूने टोचावे. एकाच टाचणीने जोर देऊन सतत टोचू नये त्यामुळे वेदना वाढतात. टाचणी बदलावी. तुमचे ग्लुकोज मीटर अचूक आहे की, नाही याची पडताळणी प्रयोगशाळेतील निरीक्षणांवरून ठरवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com