संवाद : कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम

आधुनिक काळात संगणकाशिवाय काम याची कल्पनाही करता येत नाही. कोणत्याही दुकानातील बिलिंग असो की, कार्यालयीन कामकाज यात संगणक असतोच. संगणकाचा वापर अपरिहार्य झाला आहे.
computer vision syndrome
computer vision syndromesakal

- डॉ. योगेश चौगुले

आधुनिक काळात संगणकाशिवाय काम याची कल्पनाही करता येत नाही. कोणत्याही दुकानातील बिलिंग असो की, कार्यालयीन कामकाज यात संगणक असतोच. संगणकाचा वापर अपरिहार्य झाला आहे. यामुळे आपल्या डोळ्यावर खूप ताण येऊ शकतो. संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

त्यालाच वैद्यकीय परिभाषेत ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ (सीव्हीएस) असे म्हणतात. यातून डोळ्यांची कायमस्वरूपी हानी होत नसली तरीही संगणकाचा वापर तितक्‍या सहजतेनेही करणे शक्‍य होत नाही.

संगणकावर काम करताना आपले डोळे सतत कशावर तरी केंद्रित होत असतात. डोळ्यांची सतत हालचाल होत असते. आपण बघत असलेल्या गोष्टींशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. संगणकाच्या पडद्यावरील कॉन्ट्रास्ट, फ्लिकर आणि ग्लेअर या घटकांमुळे त्यावर काम करणे हे पुस्तक वाचणे किंवा वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा कठीण असते.

आधीपासून चष्मा असलेल्यांनी त्याचा वापर न करता संगणकावर काम केल्यास संगणकाशी संबंधित डोळ्याच्या समस्या वाढण्याची शक्‍यता असते. दिवसाला तीनपेक्षा जास्त वेळ संगणकाचा वापर करणाऱ्या ९० टक्के व्यक्तींमध्ये हा आजार आढळून येतो.

डोळ्यावर ताण येणे, डोळे लालसर होणे, संगणकाच्या वापरानंतर धूसर दिसणे, डोळे कोरडे पडणे, चुरचुरणे, डोकेदुखी, मानेत किंवा पाठीत वेदना ही ‘सीव्हीएस’ची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराचा त्रास कमी कमी करण्यासाठी मॉनिटरची जागा डोळ्यांपासून साधारणतः २५ इंचांवर असावी. डोळ्याच्या रेषेपेक्षा सहा इंच खाली मॉनिटर असावा. तसेच, ‘सीव्हीएस’ला प्रतिबंध करण्यासाठी २०-२०-२० नियम महत्त्वाचा.

आपले डोळे आणि संगणकाचा पडदा यात २० इंच इतके अंतर हवे. दर २० मिनिटांनंतर २० सेकंदांचा ‘ब्रेक’. यावेळी डोळ्यांची उघडझाप नैसर्गिक होईल याकडे लक्ष द्या. यातून या आजाराला प्रतिबंध करता येईल. या आजाराच्या निदानासाठी डोळ्यांच्या काही तपासण्या केल्या जातात. त्यानंतर डोळ्यात काही औषधाचे थेंब घालण्याचा सल्लाही डॉक्‍टर देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com