Carrot Juice : वजन नियंत्रित ठेवायचंय? दररोज एक ग्लास प्या गाजराचा ज्युस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Carrot Juice

Carrot Juice : वजन नियंत्रित ठेवायचंय? दररोज एक ग्लास प्या गाजराचा ज्युस

गाजर हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरसुद्धा गाजराचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन असते जे एक अँटिऑक्सिडेंट असते. ज्याचा शरीराला खूप फायदा असतो.

जर तुम्ही दररोज गाजराचा ज्युस पिलात तर याचा तुम्हाला पुरेपुर फायदा होणार. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. (drink one glass Carrot Juice to control weight healthy lifestyle)

  • दररोज एक ग्लास गाजराचा ज्युस पिणे आरोग्यासाठी उत्तम असते.

  • गाजराचा ज्युस पिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. गाजर हे बीटा-कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये बदलते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

  • दररोज गाजराचा ज्युस पिल्याने वजन सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे डाएट करणाऱ्यांनी आवर्जून गाजराचा ज्युस प्यावा.

हेही वाचा: Benefits of Carrot : हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने हे आजार होतील दूर

  • एवढंच काय तर गाजराचा ज्युस पचनशक्तीसुद्धा कमी करते.

  • याशिवाय गाजराचा ज्युस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची लेव्हलही कमी होते.

  • तसेच गाजरातील बीटा-कॅरोटीनसुद्धा डोळ्यांचं आरोग्य सुदृढ ठेवते.

  • याशिवाय कर्करोगग्रस्त रुग्णांनाही डॉक्टर गाजराचा ज्युस पिण्याचा सल्ला देतात.