
अतिथंड पाणी प्यायल्याने मंदावतो Heart Rate; आरोग्याचे होते नुकसान
Cold Water Drinking Side Effects: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा 1 बॉटल पाणी पिल्याशिवाय तहान भागत नाही. या काळात साधे पाणी कोणी पीत नाही. रखरखत्या उन्हातून घरी येताच फ्रीजमधलं अति थंड पाणी प्यायले तर शरीर आणि मन शांत, तृप्त तर होतं असले तरी पण त्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
उन्हाळ्यामध्ये थंडीच्या काळात पाणी पिणे डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी गरजेचे आहे. पण अतिथंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. थंड पाणी आरोग्यासाठी धोकादायक कसे ठूर शकते जाणून घेऊ घ्या
अतिथंड पाणी पिण्याचे नुकसान (Side Effects of cold water)
हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावते
गार्डियन डॉट एनजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, अतिथंड पाणी प्यायल्याने हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावते. हे शरीरातील अनैच्छिक कार्ये नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूला उत्तेजित करते, ज्याला व्हॅगस नर्व्ह (Vagus nerve) म्हणतात. हा मज्जासंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाण्याच्या कमी तापमानाचा थेट परिणाम व्हॅगस नर्व्हवर होत असल्याने, हृदयाची गती अखेर मंदावते. हे हृदयासाठी चांगले नाही, कारण यामुळे हृदयाशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
बद्धकोष्ठता समस्या होऊ शकते
जर तुम्ही सतत अति थंड पाणी प्यायले तर तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते. जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता, तेव्हा अन्न शरीरातून जाताना घट्ट होते. आतडे देखील आकुंचन पावतात, जे बद्धकोष्ठतेचे एक प्रमुख कारण आहे. खोलीच्या तपमानानुसार पाणी प्यायल्याने पचनास मदत होते, असे संशोधनात दिसून आले आहे.
डोकेदुखी होऊ शकते
अति थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने मेंदू बधीर (Brain freeze) होऊ शकतो. हे मणक्यातील अनेक संवेदनशील नसा थंड पडतात आणि लगेच तुमच्या मेंदूला संदेश पाठवतात, ज्यामुळे डोकेदुखी होते. तसेच ज्या लोकांना सायनसची समस्या आहे त्यांना जास्त त्रास होऊ शकतो.
पचनक्रिया खराब होऊ शकते
अति थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ, गोळा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा अति थंड पाणी शरीरात जाते तेव्हा ते शरीराच्या तापमानाशी जुळत नाही. अति थंड पाणी शरीरात गेल्याने डब्यातील अन्न पचणे कठीण होते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी अडचणी येऊ शकतात
जेव्हा तुम्हीअति थंड पाणी पितात तेव्हा शरीरातील फॅट बर्न करणे कठीण होते. अति थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी कडक होते, ज्यामुळे चरबी फॅट बर्न करण्यासाठी समस्या निर्माण होते. वजन कमी करणाऱ्यांनी खूप मर्यादित प्रमाणात थंड पाणी प्यायले पाहिजे.