
थोडक्यात:
आपण दैनंदिन आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी विसरणं ही साधारण बाब आहे असं मानतो, पण ते नेहमीच सामान्य नसतं.
अनेकदा असं विसरणं हे वयामुळे नसून डिमेन्शियासारख्या विकाराचं सुरुवातीचं चिन्ह असू शकतं.
तज्ज्ञांच्या मते डिमेन्शियाची ५ महत्त्वाची लक्षणं वेळेत ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.
Dementia Warning Signs: बहुतेकवेळी आपण छोट्या मोठ्या गोष्टी विसरत असतो. एखादी वस्तू एक ठिकाणी ठेवून विसरून जाणे, थोड्यावेळी कोणाशी काय बोललो होतो, काम करत असताना लक्ष विचलित होणे या गोष्टी सामान्य आहेत असा आपला समज असतो. पण तसं नाहीये. बऱ्याचदा आपण वयोमानानुसार होणाऱ्या विसरभोळेपणाचा विचार करतो पण हीच विस्मरणाच्या आजाराची लक्षणं असू शकतात. डॉक्टरांनी या विस्मरणाच्या आजाराची म्हणजेच डिमेन्शियाची सुरुवातीची ५ लक्षणं सांगितली आहेत, जी दुर्लक्षित न करण्याचा इशारा दिला आहे.