Thyroid : थायरॉइड फंक्शन सुरळीत करण्यास या १० गोष्टी करतील मदत, आवर्जून फॉलो करा हे डेली रूटीन

थायरॉइडचा त्रास असलेल्या महिलांनी या १० गोष्टींचा डेली रूटीनमध्ये समावेश करून घ्यावा जेणेकरून थॉयरॉइड फंक्शन सुधारण्यास मदत होईल
Thyroid
Thyroidesakal

Thyroid : थायरॉईडचा त्रास असलेल्या महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील होतो. यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो, त्यांचे वजन वाढू लागते. अनेकांना मासिक पाळी अनियमित होणे, पीरियड्समध्ये तीव्र क्रॅम्प येणे, हात-पाय थंड पडणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा थायरॉइडचा त्रास असलेल्या महिलांनी या १० गोष्टींचा डेली रूटीनमध्ये समावेश करून घ्यावा जेणेकरून थॉयरॉइड फंक्शन सुधारण्यास मदत होईल.

डाएटिशियन मनप्रीत कालरा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये थायरॉइड सुधारण्यास मदत करणाऱ्या 10 गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये थायरॉइडचे कार्य सुधारण्यास आणि त्यावर त्वरित उपचार करण्यात मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

थायरॉइड सुधारण्यास मदत करणाऱ्या १० गोष्टी

१. धण्याचे पाणी

अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले हे पाणी थायरॉइड ग्रंथीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि ग्रंथींचे कार्य सुधारण्यास मदत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

२. ब्राझील नट्स

या नट्समध्ये सेलेनियम खूप चांगल्या प्रमाणात असते. हे थायरॉइड संप्रेरकांचे चयापचय सुधारते. यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

३. प्राणायाम

प्राणायाम हे शरीराला आणि मनाला शांत करण्यास मदत करते. तसेच, तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. याचा नियमित सराव करा.

Thyroid
Thyroid Remedies : थायरॉइडच्या समस्येवर करा हे घरगुती उपाय

४. भोपळा आणि सूर्यफूलाच्या बिया

या बियांमध्ये हेल्दी फॅट्स आणि झिंक असते. हे थायरॉइड हार्नोन्सच्या उत्पादनास उत्तेजन देते.

५. हिरव्या पालेभाज्या

या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. हे पोषक तत्व निष्क्रिय थायरॉइडचे सक्रिय थायरॉइडमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.

६. चिया सीड्स

या छोट्या छोट्या काळ्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात. याच्या सेवनाने थायरॉइड रूग्णांचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

Thyroid
Thyroid Symptoms : त्रास वाढण्याआधीच ओळखा थायरॉइडची लक्षणं, बॉडीचे हे पार्ट्स देतील इशारा...

७. सूर्यप्रकाशात वेळ घालवा

जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडतो तेव्हा त्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. थायरॉइड कार्य सुधारण्यासाठी हे एक अतिशय महत्वाचे पोषक तत्व आहे. व्हिटॅमिन डी मुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

८. आयोडीनयुक्त मीठ

थायरॉइड सुधारण्यासाठी आयोडीन आवश्यक आहे.

९. ग्लूटेन मुक्त धान्य

याचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

१०. नारळ

नारळात ट्रायग्लिसराइड्स (MCTs) असतात, जे थायरॉइड हार्नोन्सचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com