Night Eating Tips: झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका 'या' तीन गोष्टी; तुमच्या झोपेवर होईल परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Night Eating Tips

Night Eating Tips: झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका 'या' तीन गोष्टी; तुमच्या झोपेवर होईल परिणाम

Eating Habits: झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. झोप पूर्ण न होण्याची बरीच कारणं असू शकतात. तुम्हाला यापैकी काही समस्या उद्भवत असतील तर तुम्ही रात्री आहारात घेत असलेल्या गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. त्यामुळे तुमच्या आहार घेण्याच्या सवयी योग्य आहेत की नाही ते जाणून घेणे गरजेचे ठरते.

रात्री झोपताना या गोष्टी आहारात अजिबात घेऊ नका

चांगल्या झोपेचा संबंध थेट तुमच्या आहाराशी असतो. अपूर्ण झोपेमुळे तुम्हाला अनेक आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. उदा, हृदयविकार, विक इम्युनिटी, ब्रेस्ट कन्सरचा धोका, डिप्रेशन यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे झोपण्याआधी अनहेल्दी पदार्थ खाणे टाळा.

१) कॅफिनयुक्त ड्रिंक्स

रात्री जेवण करताना कांदा किंवा टमाटरह अल्कोहोल किंवा कॅफिन टाळावे. याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. (Health)

२) टमाटर

झोपण्याआधी टमाटर खाणंही आरोग्यासाठी चांगलं नाही. टमाटर अॅसिड रिफ्लेक्सचं कारणही ठरू शकतं. तसेच डायजेशनशी संबंधित समस्यांनाही कारणीभूत ठरू शकतं. एका रिपोर्टनुसार रात्री टमाटरचे सेवन तुमच्या अस्वस्थता वाढवू शकतं.

३) कांदा

टमाटरसह कांदा देखील तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टिमवर अफेक्ट करू शकतं. कांदा तुमच्या पोटात गॅस तयार करण्याचं काम करतं. ही गॅस तुमच्या गळ्यापर्यंतही येऊ शकते. त्यामुळे रात्री जेवणाआधी कांदा खाऊ नये.

जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीरासह तुमचं ब्रेन फंक्शनही विस्कटतं. दिवसभऱ्यात कमीत कमी ७ साताची झोप आवश्यक असते. त्याने तुमचे वजनही कंट्रोलमध्ये राहाते.

टॅग्स :food newsTipsSleep health