वेदात, आयुर्वेदात किंवा इतरही भारतीय शास्त्रांमध्ये मनुष्याचे आयुर्मान १०० वर्षे सांगितलेले आहे आणि प्रत्येकाने १०० वर्षांचे आयुष्य समर्थपणे जगावे यासाठी मार्गदर्शनही केलेले आहे. कायाकल्प, जराचिकित्सा अशा अनेक उपचारांचा मूळ हेतू म्हातारपण येऊ न देणे, जीवन खऱ्या अर्थाने व पुरेपूर जगणे असा आहे. इतकेच नाही तर आरोग्यरक्षणासाठी रोज सांगितलेल्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा तारुण्य टिकून राहावे, या उद्देशाने सांगितलेल्या आहेत.