Surya Namaskar Mistakes : सूर्य नमस्काराचा सराव करताना या 3 चुका करताय? ऋजुता दिवेकरनं सांगितली महत्त्वपूर्ण माहिती

Surya Namaskar Mistakes : सूर्य नमस्काराच्या सर्व स्टेप्स योग्य पद्धतीने न चुकता करणे आवश्यक आहे. अन्यथा शारीरिक फायदे मिळण्याऐवजी तोटेच होण्याची अधिक शक्यता आहे.
Surya Namaskar Mistakes
Surya Namaskar MistakesSakal

सूर्य नमस्काराच्या (Surya namaskar benefits In Marathi) सरावामुळे शरीराच्या सर्व अवयवांना खूप फायदे मिळतात. या व्यायामामुळे डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व अवयवांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. म्हणून तज्ज्ञमंडळी वर्कआऊट रूटीनमध्ये सूर्यनमस्काराचा समावेश करण्यावर अधिक भर देतात. सूर्य नमस्काराच्या अभ्यासामुळे शरीर आणि मन मजबूत होते.

पण सूर्य नमस्काराचा अभ्यास करताना आपण काही चुका केल्यास शरीरास फायदे मिळण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते. सूर्य नमस्काराचा सराव करताना कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे, याची माहिती सांगणारा व्हिडीओ प्रसिद्ध सेलेब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (rujuta diwekar tips for surya namaskar) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊया त्यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती… 

Surya Namaskar Mistakes
Weight Loss Tea ‘हा’ चहा पिऊन वेटलॉस करणे होईल सोपे, इतरही मिळतील जबरदस्त फायदे

सूर्यनमस्कार करताना ‘या’ तीन चुका टाळा (mistakes while performing Surya Namaskar explained by Rujuta Diwekar)


खांदे आणि कान एकमेकांजवळ आणू नये  

सूर्यनमस्कार करताना जेव्हा आपण हाताचे पंजे जमिनीवर ठेवता त्यावेळेस खांदे आणि कान एकमेकांजवळ आणू नये. अशी चूक केल्यास शरीरास कोणतेही फायदे मिळणार नाहीत. याऐवजी गुडघे सरळ ठेवा आणि कमरेचा भाग वरील बाजूस ताणावा. यानंतर पंजे जमिनीवर व्यवस्थित ठेवा आणि खांदे कानांपासून दूर सरळ रेषेत असावेत.    

Surya Namaskar Mistakes
Workout At Home For Weight Loss पावसामुळे जिममध्ये जाता येत नाहीय? वजन घटवण्यासाठी घरच्या घरी करा हे 5 सोपे व्यायाम

नितंब व पाय सरळरेषेत न ठेवणे   ( Hips are not aligned)

दुसरी आणि मोठी चूक म्हणजे प्लँक पोझिशनमध्ये जाताना बहुतांश जण नितंबचा भाग स्क्वीझ करून मांड्या जमिनीच्या दिशेनं वाकवतात. याऐवजी नितंबचा भाग स्क्वीझ करा, मांड्या व दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवा. सूर्यनमस्काराची ही स्टेप आपण चुकीच्या पद्धतीने केली तर कंबर दुखण्याची शक्यता असते. 

Surya Namaskar Mistakes
Weight Loss: या सवयी जिमपेक्षा जास्त फायदेशीर, वजन कमी करण्याचा सोपा उपाय!

अधोमुखोश्वानासनादरम्यान होणारी मोठी चूक   

अधोमुखोश्वानासन स्थिती येत असताना नितंब, पाय आणि हात योग्य स्थितीत नसल्यास आपण खाली कोसळू शकता. यामुळे कमरेच्या वरील शरीर नीट सांभाळावे. तसंच या स्थितीतही आपले खांदे व कान एकमेकांच्या जवळ येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.  

ऋजुता दिवेकरनं दिला मोलाचा सल्ला

तसंच सूर्यनमस्काराचा सराव करताना नेहमी योग मॅटच्या पहिल्या टोकाजवळ उभे राहावे आणि दररोज किमान सूर्यनमस्काराच्या तीन सेटचा सराव करावा, असाही सल्ला ऋजुता दिवेकरनं दिला आहे.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com