

Ideal Seasons and Timing for Daily Exercise
Sakal
डॉ. मालविका तांबे
आधुनिक जीवनशैलीत आजारांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढताना दिसत आहे. पण त्याच बरोबरीने एक महत्त्वाचा चांगला बदल झालेला आहे तो म्हणजे लोकांची स्वास्थ्याप्रतीची जागरूकता. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे स्वस्थ राहायचा प्रयत्न करत आहेत. आहाराबरोबरच व्यायामसुद्धा लोक स्वतःच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्यायामाचे बरेचसे प्रकार असतात. उदाहरणार्थ, चालायला जाणे किंवा पळायला जाणे, घरी किंवा क्लास लावून योगासने करणे, जिम ट्रेनिंग घेणे, मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालविणे, नृत्य करणे, ट्रेकिंग करणे किंवा डोंगरांवर चढणे इत्यादी. अर्थातच प्रत्येक व्यायाम प्रकार प्रत्येकाला जमतोच असा नाही. स्वतःसाठी काय इष्ट ठरू शकेल? याच्याकरिता सर्वप्रथम आपण व्यायाम काय असतो आणि त्याचे काय फायदे व नियम असतात हे जाणून घेऊया.