Filariasis Disease : पाय हत्ती सारखे सुजलेत तर असू शकते हे कारण; वेळीच उपचार घ्या, नाहीतर...

हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग आहे
Filariasis Disease
Filariasis Diseaseesakal
Updated on

Filariasis Disease : नदी कडेला राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पूर येत असल्याने घरातून स्थलांतर करावे लागते. जनावरे, घरातील व्यक्तींच्या योग्य निवाऱ्याची सोयही करावी लागते. आपल्या घरी परतण्यासाठी त्यांनी पूर ओसरण्याची वाट पहावी लागते.

घरी परतल्यावर त्या लोकांना घर, परिसर स्वच्छ करावा लागतो. घाण पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. पूरजन्य स्थितीचा सामना केलेल्या लोकांचे पाय सुजण्याची साथ पसरली आहे. याला फाइलेरियासिस असे म्हणतात.

या आजारात रोगी व्यक्तीचे पाय हत्तीच्या पायासारखे सुजतात. ज्याला हत्तीरोग म्हणतात. त्याची कारणं आणि लक्षणं काय आहेत हे जाणून घेऊयात.(Filariasis Disease : In this disease, your feet become like an elephant, know the causes, symptoms and preventive measures )

Filariasis Disease
Monsoon Health Tips : गॅरेंटी देऊन सांगतो पावसाळ्यात श्वसनाचे हे आजार तुम्हाला होणारच, आधीच घ्या ही काळजी!

फिलेरियासिस म्हणजे काय?

हत्तीरोग (लिम्फॅटिर फायलेरियासिस) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. यामध्ये रुग्णांचे पाय, वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होऊन बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो.

हत्तीरोग हा “क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई असे म्हणतात त्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चावल्यामुळं होतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते.

फाइलेरियासिस नावाचा हा आजार पावसाळ्यात अधिक प्रमाणात पसरतो. विशेषत: ज्या गावात आणि यावेळी पूरपरिस्थिती आहे किंवा पाणी साचले आहे.  फिलेरियासिस हा निमॅटोड परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. यामुळे शरीरात सूज आणि ताप येऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे शरीराच्या संरचनेत बदल होऊ शकतात जसे की त्वचा फुगणे, पाय सुजणे. (Filariasis)

Filariasis Disease
Monsoon Health Tips: लोकं हो, पावसाळ्यातले आजारपण टाळायचेय? या टिप्स नक्की फॉलो करा

फिलेरियासिस कशामुळे होतो?

हे रक्त शोषणाऱ्या डासांच्या प्रजातींच्या फिलेरियल वर्म्समुळे होते. यामध्ये आपल्या लसीका प्रणाली किंवा लसीका प्रणालीला संसर्ग होतो. लिम्फॅटिक प्रणाली शरीरातील द्रव पातळी संतुलित करते आणि आपल्या शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.

परंतु जेव्हा हा कीटक तुम्हाला चावतो तेव्हा ही लसीका प्रणाली असंतुलित होते आणि नंतर या मुळे शरीरात सूज येते. फिलेरियासिस असलेल्या तीनपैकी दोन व्यक्तींमध्ये गंभीर लक्षणे दिसतात. कारण या आजारात रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरात गंभीर बदल होतात. (Monsoon Health Tips)

 जसे-

  1. सूज - जी पाय मोठ्या प्रमाणावर दिसू शकते. लिम्फेडेमा, ज्यामध्ये तुमच्या लिम्फ प्रणालीमध्ये द्रव तयार होतो आणि सूज आणि ताप येतो. स्क्रोटममध्ये सूज आणि पू जमा होणे. तुमचे हात, पाय, स्तन आणि महिला जननेंद्रियांमध्ये सूज आणि पू जमा होऊ शकतात.

  2. डोकेदुखी - या आजारात तुम्हाला तिव्र डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो.

  3. ताप - या आजारात तापाची साथही पसरू शकते. चढ- उतार होणारा ताप याचे प्रमुख लक्षण आहे.

  4.  पाय दुखणे, सुजणे

  5. वृषण आकराने जाड होणे.

  6. मनुष्याचे दोन्ही पाय, हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होतात आणि हालचाल करण्यास अवघड होते.

Filariasis Disease
Monsoon Health Tips : गॅरेंटी देऊन सांगतो पावसाळ्यात श्वसनाचे हे आजार तुम्हाला होणारच, आधीच घ्या ही काळजी!

फायलेरियासिससाठी प्रतिबंध उपाय

  1. डासांपासून बचाव करा

  2. घराभोवती पाणी साचू देऊ नका. शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून डास आणि कीटक आजूबाजूला जमणार नाहीत.

  3. घरातील हवा शुद्ध करण्यासाठी घरात कडुलिंबाची पाने जाळून पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.

  4. ज्‍या रुग्‍णांमध्‍ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्‍णांना डीईसी (डायइथील कारबामाझाईन) या गोळया ६ मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन या प्रमाणात १२ दिवस देण्‍यात येतात.

  5. रुग्‍णांने पायाची स्‍वच्‍छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्‍यायाम करणे हे महत्‍वाचे असते.

  6. हत्‍तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्‍य उपचार घेणे आवश्‍यक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com