Food Benefits : रिकाम्यापोटी हे पदार्थ खाऊन बघा, हार्ट अटॅक अन् मधुमेहावर बेस्ट टॉनिक ठरेल

कोणते अन्न चांगले आहे कोणते पदार्थ रिकाम्या पोटी खाणे चांगले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न बरेच जण करत नाही
Food Benefits
Food Benefitsesakal

Food Benefits : चांगल्या आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ असणे फार गरजेचे आहे. ब्रेड, भाज्या, फळे आणि इतर अन्नपदार्थ ऊर्जा, पोषक तत्व आणि खनिजे प्रदान करतात. पण कोणताही खाद्यपदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती? कोणते अन्न चांगले आहे कोणते पदार्थ रिकाम्या पोटी खाणे चांगले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न बरेच जण करत नाही. दिवसभऱ्यात तुम्ही खात असलेल्या पदार्थांत पौष्टिक तत्व आणि ते खाण्याची वेळ हेसुद्धा फार गरजेचे असते. चला तर योग्य वेळी योग्य आहाराचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

लसूण गरम पाण्यासह घ्या

लसूण गरम पाण्यासोबत खाणे खूप फायदेशीर ठरते. लसूण अँटीफंगल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी घटकांनी समृद्ध आहे. लसूण गरम पाण्यासोबत खाणे हाडांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय ते कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ठरतो. त्याच वेळी, इन्सुलिन नियंत्रित करून, ते साखरेची पातळी योग्य ठेवते.

मेथीचे पाणी प्या

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी खूप फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यामध्ये अमिनो अॅसिड असते. हे रक्तातील साखरेचे विघटन आणि नियंत्रण करण्याचे काम करते. याचा लाभ मधुमेहाच्या रुग्णांना होऊ शकतो. तसेच हृदयाचे स्नायू मजबूत होतात. सगळे मेथीचे दाणे खाणे देखील फायदेशीर आहे. (food)

Food Benefits
Vitamin A Foods : डोळ्यांसाठी फायदेशीर आहे ‘Vitamin A’; जाणून घ्या, ते कोणत्या पदार्थात जास्त मिळतं!

दालचिनीचे पाणी देखील फायदेशीर आहे

दालचिनी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. याशिवाय हृदयरोगींसाठीही दालचिनी फायदेशीर आहे. याचे सेवन करण्यासाठी दालचिनीचे तुकडे पाण्यात मिसळा. दुसऱ्या दिवशी सकाळी याचे सेवन करणे चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com