esakal | वीर्य बाहेर टाकण्याची क्रिया पोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करते?

बोलून बातमी शोधा

Prostate Cancer
वीर्य बाहेर टाकण्याची क्रिया पोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करते?
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- प्रोस्टेट कॅन्सरबाबत एक उत्साहवर्धक माहिती समोर आली आहे. नियमित वीर्य बाहेर टाकल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. नेमकं किती वेळा वीर्य बाहेर टाकावे? हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार, महिन्यातून 21 वेळा असं करावं. ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासानुसार आठवड्यातून 7 वेळा वीर्य बाहेर टाकावे. पण, अभ्यासात असंही सुचवण्यात आलंय की, 50 वर्ष वयांपुढील व्यक्तींमध्येच याचे परिणाम दिसून येतील.

अभ्यासात काय सांगण्यात आलंय?

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी अनेक उपाय करता येतात. त्यातच व्यक्तीला आनंद देणारी गोष्ट त्यांना प्रोस्टेट कॅन्सरपासून रोखू शकते ही सुखावणारी बातमी आहे. नियमित विर्य बाहेर टाकण्यामुळे प्रोस्टेट ग्लॅडचे संरक्षण, संसर्गापासून बचाव होतो, असं संशोधन सांगते. नियमित वीर्य बाहेर टाकल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचे अनेक पुरावे असले तरी या संशोधनाबाबत वाद कायम आहे.

हेही वाचा: शाब्बास! गावच्या पोरांनी करुन दाखवलं; WhatsApp मधून गोळा केली 'आरोग्य'साठी लाखोंची मदत

2008 मधील एका संशोधनानुसार, तरुण वयामध्ये लैंगिक संबंधाबाबत अत्यंत सक्रिय असणाऱ्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होतो. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संशोधनानुसार, तरुण वयात नियमित वीर्य बाहेर टाकल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यामुळे यासंबंधात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. 18 वर्ष चाललेल्या हार्वर्डच्या संशोधनात जवळपास 30 हजार संधोधकांनी सांगितलंय की महिन्यातून 21 वेळा वीर्य बाहेर टाकल्याने प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका 20 टक्क्यांनी कमी होता. ऑस्ट्रेलियन संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून 7 वेळा वीर्य बाहेर टाकल्याने कॅन्सरचा धोका 36 टक्क्यांनी कमी होता.

कुणाला पोस्टेट कॅन्सर होऊ शकतो?

- 50 वर्षांपुढील व्यक्तींना प्रोस्टेट कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे

- आफ्रिकन-अमेरिक नागरिकांमध्ये अशाप्रकारचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो

- कुटुंबियांतील कुणाला प्रोस्टेट कॅन्सर झाला असल्यास तुम्हालाही तो होण्याचा धोका वाढतो

- शारीरिक निष्क्रियता, लठ्ठपणा असलेल्यांना जास्त धोका

- उंच व्यक्तींमध्ये प्रोस्टेट कॅन्सर जास्त आढळतो

पोस्टेट कॅन्सरमध्ये लघवी करताना त्रास होणे, रक्त पडणे, सतत जळजळ अशाप्रकारचा त्रास जाणवतो. पोस्टेट कॅन्सर नेमका कशामुळे होतो याबद्दल माहिती नाही. पण, निरोगी जीवन आणि हेल्थी डायट तुम्हाला यापासून दूर ठेवू शकते. फळ आणि भाजीपाल्यांचे नियमित सेवन फायद्याचे ठरते.