esakal | बिनधास्त खा अन् तंदुरुस्त रहा! कोरोनात मुबलक ऑक्सिजनयुक्त 'या' फळ-भाज्यांचा करा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

बिनधास्त खा अन् तंदुरुस्त रहा! कोरोनात मुबलक ऑक्सिजनयुक्त 'या' फळ-भाज्यांचा करा वापर

बिनधास्त खा अन् तंदुरुस्त रहा! कोरोनात मुबलक ऑक्सिजनयुक्त 'या' फळ-भाज्यांचा करा वापर

sakal_logo
By
डॉ. प्रमोद फरांदे

कोल्हापूर : कोरोनाचे संकट (crisis of the corona)आणि ऑक्सिजनची कमतरता याभोवती सध्या जगण्याचा संघर्ष सुरू आहे. आपल्या शरीराला शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन (Oxygen)न मिळाल्यास अनेक आजारांना निमंत्रण ठरलेले. नोबेल विजेते जर्मन डॉक्टर ओटो वारबर्ग (Nobel laureate German doctor Otto Warburg)यांच्या संशोधनानुसार, शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन असल्यास कर्करोग (Cancer)होत नाही, तसेच शरीर ॲसिडिकऐवजी अल्कलाइन (Alkaline instead of acidic)असल्यास कोणताही आजार होत नाही.

अगदी कर्करोगाचाही टिकाव लागत नाही. निरोगी राहण्यासाठी शरीर अल्कलाइन ठेवण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहायला हवे. अल्कलाइनयुक्त आहारास ऑक्सिजनयुक्त आहार असेही म्हणता येईल. अशा आहाराचे रोज सेवन केल्यास निरोगी राहणे शक्य आहे आणि सद्यस्थितीत तर तो अत्यंत उपयुक्त आहे.

Fruits vegetables can provide abundant oxygen benefits tips marathi news

ऑक्सिजनयुक्त फळे (Oxygenated fruits)

आपल्याला विविध प्रकारची फळे उपलब्ध आहेत. फळांमधून व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात, त्याबरोबरच शरीर अल्कलाइन ठेवण्यासाठी फळे उपयुक्त ठरतात. त्यातून शरीराला ऑक्सिजन उपलब्ध होतो. कोणत्या फळांमधून काय फायदा होतो पाहू.

केळी : कच्ची आणि पक्की केळी ॲसिडिक नसतात. त्यांचा पीएच ४.५ ते ४.७ असतो. केळ्यांमुळे ऑक्सिजन लेव्हल वाढू शकते.

किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे ब्लड सेलमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढतो.

लिंबू : लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतेच, त्याबरोबर शरीराला ऊर्जाही मिळते. लिंबाच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढते.

द्राक्षे : द्राक्षांतील ॲण्टीऑक्सिजंट उपयुक्त ठरतात.

पपई : शरीरातील ब्लड सेल्समध्ये ऑक्सिजन वाढवते. रोजच्या सेवनाने रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. पपईच्या बियाही शरीरासाठी उपयुक्त असतात.

आंबा : ठराविक कालावधीत मिळणाऱ्या आंब्यामधून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. आंबा रोजच्या आहारात जरूर असावा, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

टरबूज : पीएच लेव्हल ८ च्या वर असतो. यामध्ये अल्कलाइनचे प्रमाण अधिक असल्याने ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते.

पेरू : रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी. सात्त्विक गुणधर्म आणि बुद्धिवर्धक फळ असल्याने मानसिक थकवा दूर होतो. व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.

संत्री : संत्री सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते.

हेही वाचा- 'दादांची माया कोठे आहे ते मला माहितीय'

फळांप्रमाणे काही भाज्याही अल्कलाइन (Vegetables alkaline)असतात. या भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीरातील ऑक्सिजन वाढविण्यास चांगला फायदा होतो.

लसूण : पीएच ८ च्या वर असते. अल्कलाइन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टर रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक कुडी खाण्याचा सल्ला देतात.

काकडी : काकडीत ९५ टक्के पाणी असते. व्हिटॅमिन सी, के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज, सिलीका असते. काकडी ॲसिडीक नसते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन वाढविण्यास उपयुक्त.

ब्रोकली, कोबी : ब्रोकली, कोबी हे एक प्रकारे औषध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, फोलिक ॲसिड, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आदी पोषक तत्त्वे असतात. या भाज्यांतून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

रताळे : पौष्टिक रताळे अल्कलाइन असल्याने त्याच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढते. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, आयर्न, फॉस्फरस, बीटा कॅरोटिन आदी घटक असल्याने कर्करोग रुग्णांसाठी उपयुक्त ठरते.

गाजर : जमिनीखाली येणाऱ्या सर्व भाज्या अल्कलाइन अधिक असतात. या भाज्या शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी उपयुक्त ठरतात. त्यात व्हिटॅमिन ए, सी, के याबरोबरच पोटॅशियम, आयर्न असते. बीटा-कॅरोटिन घटकामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

पालेभाज्या : पालक, मेथी, चाकवत, पात्री, करडा अशा पानांच्या

भाज्यांमधून अल्कलाइन सहज उपलब्ध असते, त्यामुळे ऑक्सिजन वाढविण्यासाठी त्या फायदेशीर ठरतात. विशेषत: या भाज्यांचे सूप रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

ग्रीन टी : ग्रीन टीचा पीएच लेव्हल ७ च्या पुढे असतो. त्यामुळे त्यामध्ये अल्कलाइन अधिक प्रमाणात असते.

तुळस : ॲण्टीऑक्सिजंट असतात, ते शरीराला फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतात. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी उपयुक्त.

मोड आलेले धान्य : यामध्ये क्लोरोपाइल मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील ऑक्सिजनवाढीसाठी तो सर्वात मोठा सोर्स आहे.

फ्लेक्स सीड्‌स : यामध्ये ओमेगा ३ आणि फॅटी ॲसिड असते. त्याचबरोबर फायबरही मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व घटक शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवितात.

ड्रायफ्रुट : बदाम, किसमिस, काजू, पिस्ता, अक्रोड आदीमध्ये अल्कलाइन मोठ्या प्रमाणात असल्याने याचे नियमित व प्रमाणात सेवन आरोग्यदायी ठरते.

आपली पारंपरिक आणि विशेषतः महाराष्ट्रीय आहारशैलीच इतकी आरोग्यदायी आहे, की शरीराला आवश्यक सर्व पोषणमूल्ये त्यातून मिळतात. कडुनिंबापासून बहाव्यापर्यंत आणि तुळशीपर्यंत अशा विविध देशी वनस्पतींशी भारतीय माणसाचे साहचर्य राहावे आणि त्याला मुबलक प्राणवायू मिळावा, या उद्देशानेच आपल्याकडे विविध परंपरा सुरू झाल्या आणि त्या आपण जपल्याच पाहिजेत.

- डॉ. अमर अडके

Fruits vegetables can provide abundant oxygen benefits tips marathi news