परीक्षेची तयारी आणि पोषण

विद्यार्थी आपल्या भविष्याला आकार देणाऱ्या निरनिराळ्या परीक्षांची तयारी करताना प्रचंड तणावात असतात.
Exam preparation and nutrition
Exam preparation and nutritionsakal

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

विद्यार्थी आपल्या भविष्याला आकार देणाऱ्या निरनिराळ्या परीक्षांची तयारी करताना प्रचंड तणावात असतात. अभ्यासात प्रावीण्य मिळवण्याच्या नादात आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीकडे सहज दुर्लक्ष होते. परंतु, आपल्या परीक्षेतील यशासाठी मेहनत करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार व व्यायाम हा परीक्षा काळातील अपरिहार्य भाग आहे.

पोषणाचे महत्त्व

योग्य पोषण हा शारीरिक व मानसिक आरोग्याचा पाया आहे. परीक्षेच्या काळात मेंदूला बराच ताण असतो. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नियमितपणे पोषणतत्त्वांची गरज असते. आकलनशक्ती, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यासाठी प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व क्षारयुक्त संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

मेंदूच्या क्षमतेसाठी पोषणतत्त्वे : माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, सुकामेवा (नट्स) व तेलबिया यांचा उपयोग आकलनशक्ती वाढवण्यासाठी होतो. यांचा खाण्यात समावेश केल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते, ज्याची परीक्षेत प्रचंड प्रमाणात हवी असणारी माहिती साठवायला गरज आहे.

संतुलित आहार : विद्यार्थ्यांनी आपल्या जेवणात फळे, भाज्या, पूर्ण धान्य आणि हलकी प्रथिने समाविष्ट असतील हे पाहावे. या समतोल आहारात केवळ पोषणतत्त्वेच असतात असे नाही, तर यामुळे रक्तशर्करा नियंत्रणात राहते. अभ्यास करताना अचानक थकवा येण्यापासून प्रतिबंध होतो.

हायड्रेशन : योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास (हायड्रेटेड असल्यास) त्याकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु मेंदूचे काम व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. कमी पाणी प्यायल्याने थकवा येतो, लक्ष केंद्रित होत नाही व एकंदरीत परिणामांवर मानसिक कमतरता जाणवते. विद्यार्थ्यांनी दिवसभरात पुरेसे पाणी प्यायला हवे.

व्यायामाची भूमिका

नियमित शारीरिक व्यायामामुळे एकंदर आरोग्याला फायदा होतो. मेंदूच्या कार्यात भर पडून ताण (स्ट्रेस) कमी होतो.

ताण कमी करणे : व्यायामामुळे नैसर्गिकरीत्या ताण कमी होतो. परीक्षेच्या तयारीबाबत असणारी चिंता कमी होण्यास मदत होते. जाॅगिंग, योग किंवा साधे चालणेदेखील बऱ्यापैकी ताण कमी करून मन प्रसन्न करते.

एकाग्रता वाढणे : शारीरिक व्यायामामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे नवीन मज्जातंतूंची वाढ होऊन मेंदूच्या कार्यात वाढ होते. यामुळे एकाग्रता व पर्यायाने स्मरणशक्ती वाढते.

चांगली झोप : नियमित व्यायाम केल्याने चांगली झोप लागते. पुरेशी झोप एकंदर विचारशक्ती व स्मरणशक्तीसाठी खूपच महत्त्वाची आहे. यामुळे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या वेळेचा पूरेपूर उपयोग करून घेऊ शकतात.

पोषण व व्यायामाचा समतोल

जेवणनियोजन : विविध पोषणतत्त्वे असलेले पदार्थ ज्यामुळे सतत शक्ती मिळेल असे जेवणनियोजन करावे. आपल्या दैनंदिन जीवनात व्यवस्थित जेवण (२ वेळा), अल्पोपाहार (स्नॅक्स) व हायड्रेशन सहज मिसळून जायला हवे.

शारीरिक व्यायामाचा समावेश : अभ्यासाच्या एकदम भरीव वेळापत्रकात व्यायामासाठी वेळ काढणे अतिशय महत्त्वाचे असते. थोडासा वर्कआऊट, योग किंवा चालणे यांसारख्या एखाद्या व्यायामाचा रोजच्या वेळापत्रकात समावेश बरेचसे फायदे देऊन जातो.

शैक्षणिक प्रगतीचा पाठपुरावा करताना विद्यार्थी आपल्या जीवनशैलीच्या निवडीचा एकंदर कामगिरीवरील प्रभाव कमी लेखतात. योग्य पोषण व नियमित व्यायाम या पैलूंना प्राधान्य दिल्यास विद्यार्थी, बोर्डाच्या किंवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात असणाऱ्या आव्हानांना दिशा दाखवण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक व मानसिक लवचिकता मिळवतील. सुदृढ शरीर व मन यांमुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिक कामगिरीत यशस्वी होत नाहीत, तर जीवनभरासाठी चांगल्या सवयी जतन करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com