

H1N1 Virus cases surge in delhi
sakal
दिल्लीमध्ये सध्या H1N1 फ्लूने पुन्हा चिंता वाढवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्येत तब्बल सहा पटीने वाढ झाली असून, आतापर्यंत १,३४४ रुग्णांची नोंद झाली आहे. सुरुवातीला साधा ताप, खोकला किंवा अंगदुखी वाटणारा हा संसर्ग काही लोकांसाठी गंभीर ठरू शकतो. त्यामुळे H1N1 ची नेमकी लक्षणे कोणती, कोणाला जास्त धोका आहे आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.