आरोग्य
H5N5 Virus: 'बर्ड फ्लू'च्या दुर्मिळ विषाणूचा धोका वाढला, 'इथे' झाला पहिला मृत्यू; आरोग्य विभागाकडून निवेदन
Rare H5N5 Bird Flu Strain Causes First Human Death in Washington: लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. मृत व्यक्ती हा वृद्ध आणि अनेक व्याधींनी ग्रस्त होता.
Bird Flu New Strain: मागच्या दशकापासून जगभरात अनेक विषाणूंचं संक्रमण झाल्याचं बघायला मिळालं. कोरोना व्हायरस हे त्यातलं मोठं उदाहरण. या नवनव्या आजारांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू व्हायरलचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय.

