Child Care : स्वत:चेच केस ओढून खात होती १० वर्षांची मुलगी; पोटातून निघाला १०० ग्रॅमचा केसांचा गोळा

सुमारे २ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर आता रुग्णाची प्रकृती स्थिरावली आणि ती या वेदनांपासून मुक्त झाली आहे.
Trichophagias  trichotillomania
Trichophagias trichotillomaniagoogle

मुंबई : एका १० वर्षांच्या मुलीच्या पोटातून १०० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा यशस्वीपणे काढण्यात बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे डॉक्टर यशस्वी ठरले आहेत.

या मुलीला ट्रायकोफेगियास, ट्रायकोटिलोमॅनियाचा त्रास आहे. त्यामुळे तिने स्वतःचे केस ओढले आणि ते ओढलेले केस खाल्ल्याने हा गोळा पोटात तयार झाला यामुळे तिला पोटात तीव्र वेदना होत होत्या.

सुमारे २ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर आता रुग्णाची प्रकृती स्थिरावली आणि ती या वेदनांपासून मुक्त झाली आहे. (Hair ball weighing 100 grams was removed from the abdomen of a 10-year-old girl what is Trichophagias trichotillomania ) हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Trichophagias  trichotillomania
Parenting Tips : मुलांशी सतत वाद होत असतील तर काय कराल ?

दादर येथील एका मुलीला वयाच्या ९ व्या वर्षी मासिक पाळी आली म्हणून ती मासिक पाळीची औषधे घेत होती. रुग्णाला खूप रक्तस्त्राव होत होता आणि त्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ पोटदुखी होत होती, पण त्याचा त्रास होत नव्हता.

तिला उलट्या होणे, हालचाल करताना वेदना जाणवणे, वजन कमी होणे यासारखी इतर कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे आढळून आली नव्हती. तिचे कुटुंब घाबरले आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करुन विविध डॉक्टरांचा सल्ला घेतला.

यावेळी असे समजले की, या वेदना मेसेंटरिक लिम्फॅडेनाइटिसशी संबंधित आहे ज्यामुळे ओटीपोटाच्या लिम्फ नोड्सला सूज आली आहे. तिला डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. ही स्थिती सामान्यतः तिच्या वयोगटातील रुग्णांमध्ये दिसून येते ज्यामुळे ओटीपोटात वेदना होतात.

वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णावर लक्षणात्मक उपचार केले जातात. रुग्णाला तिच्या पोटाला स्पर्श करताना गाठ असल्यासारखे जाणवले आणि तिने हे तिच्या आईला सांगितले. तिची आई घाबरली आणि तिने पुढील उपचारासाठी मुलीला वाडिया रुग्णालयात दाखल केले.

बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे बाल शल्यचिकित्सक डॉ पराग करकेरा सांगतात की क्लिनिकल तपासणीत, आम्हाला पोटात गाठ असल्याचे जाणवली. ओटीपोटात दुखत असलेले रुग्ण नियमितपणे येतात परंतु तेथे गाठ जाणवत नाही.

आम्ही एक सीटी स्कॅन केले ज्यामध्ये ट्रायकोबेझोअर दिसले जो पोटातील केसांचा गोळा होता आणि त्याचा काही भाग ड्युओडेनममध्ये (लहान आतड्याचा पहिला भाग) दिसून आला. केस विरघळण्यास सक्षम नसतात, म्हणून ते पचनसंस्थेत राहातात आणि नंतर ते बॉलच्या आकारातील गोळा किंवा वस्तुमानात रूपांतरीत होऊन ते सतत वाढत जाते.

मुलांमध्ये हे क्वचितच दिसून येते. या रुग्णाला ट्रायकोटिलोमॅनिया आहे. म्हणजेच अशी स्थिती ज्यामध्ये स्वतःचेच केस काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. तिला ट्रायकोपागियाचा त्रासही होता, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःचे केस खाते.

तिच्या आई-वडिलांनाही तिचे केस खाण्याबाबत माहिती नव्हती. तपासणीनंतर, तिला गॅस्ट्रोटॉमी आणि केसांचा गोळा काढून टाकण्यासाठी लॅपरोटॉमीचा सल्ला देण्यात आला.

Trichophagias  trichotillomania
Social Media : मुलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो शेअर करणारे पालक जाणार तुरुंगात

डॉ करकेरा पुढे सांगतात की, गॅस्ट्रोटॉमी म्हणजे बेझोअर काढून टाकण्यासाठी पोटात एक छिद्र तयार करावे लागते. या प्रकरणात ट्रायकोबेझोअर हे गिळलेल्या केसांपासून बनलेले वस्तुमान होते. ही प्रक्रिया सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर 100 ग्रॅम वजनाचा हेअरबॉल काढण्यात आला.

शस्त्रक्रियेनंतरच्या सातव्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास आतड्यांसंबंधी समस्या किंवा आतड्यांना छिद्र येणे म्हणजेच पोटाच्या भिंतीला छिद्र आणि लहान आतड्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनच्या कार्यकारी प्रमुख डॉ मिन्नी बोधनवाला सांगतात की, रुग्णांवरीस उपचाराकरिता चांगल्या दर्जाची अत्याधुनिक उपकरणे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाडिया हॉस्पिटल हे गंभीर किंवा जीवघेणे आजार असलेल्या मुलांवर यशस्वी उपचार करणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते.

त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, वाडिया हॉस्पिटल त्वरीत आणि अचूक निदान करु शकते. उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांव्यतिरिक्त, वाडिया हॉस्पिटल आपल्या सर्व रूग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरवितो.

माझ्या मुलीला अधूनमधून पोटदुखीचा सामना करावा लागत होता जो कालांतराने वाढत गेला. तिला औषध देऊनही वेदना थांबत नसल्याने आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. आम्ही अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण ते तिच्यावर उपचार करू शकले नाहीत. तिच्या पोटात केसांचा गोळा असल्याचे कळाल्यावर आम्हाला धक्काच बसला.

डॉक्टरांनी त्वरित निदान आणि उपचार केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मुलांच्या आरोग्यासंबंधी कोणत्याही तक्रारी दिसून आल्या तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्याावा असे आवाहन मी इतर पालकांना करते अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या आईने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com