

Health Benefits Halasana | Step-By-Step Guide
sakal
Halasana Yoga Benefits for Digestion, Diabetes & Hernia: आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे आपण आजारपणाला आमंत्रण देत असतो. म्हणून रोजच्या जीवनात काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या. शिळे अन्न, तेलकट, तिखट, आंबट आणि पचण्यास जड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. कॉफी आदी उष्ण पदार्थ, उपहारगृहातील अस्वच्छ व सडक्या पदार्थांचे सेवन करू नये. भूक नसताना जेवू नये तसेच भूक लागल्यानंतर जेवल्याशिवाय राहू नये. ऋतुमानाप्रमाणे वयोमानाप्रमाणे आपला आहार असावा.