Health Care : निरोगी आरोग्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची, 'अशा' पद्धतीने धुवा हात

Health Care : आजारांचे जंतू हे हातावरूनच पोटात जातात. त्यामुळे रोगजंतूंपासून बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे.
Health Care
Health Careesakal

Health Care : आजारांचे जंतू हे हातावरूनच पोटात जातात. त्यामुळे रोगजंतूंपासून बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे. हात धुण्याच्या सवयीसोबतच इतरही स्वच्छताविषयक सवयींमध्ये योग्य बदल घडून आणण्यासाठी शाळेसह घरी दैनिक उपक्रम राबविले जावे.

मुलांना जेवतानाच नव्हेतर काहीही खाण्यापूर्वी हात धुणे पहिले कर्तव्य असल्याचे समजावून सांगितल्यास आणि नियमित शास्त्रीयदृष्ट्या २० सेकंद हात चोळून धुतल्यास संसर्गजन्य आजारांना दूर ठेवता येईल, असे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

Health Care
Monsoon Health Care : आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.! संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी

हात कधी धुवावेत

  • जेवण्यापूर्वी

  • जेवण झाल्यावर

  • शिंकल्यानंतर

  • पाळीव प्राण्याला हात लावल्यावर

  • शौचालयात जाऊन आल्यावर

  • वाहनातून प्रवास केल्यावर

  • पैसे मोजल्यावर

असे धुवावे हात

  • हातावर पुरेसा द्रव साबण लावून घ्यावा.

  • दोन्ही हात एकमेकांवर घासून धुवावे

  • दोन्ही हातांचे तळवे, बोटे, नखे स्वच्छ होईपर्यंत चोळावे

  • दोन बोटांच्या मधला भाग स्वच्छ करावा

  • हात धुतल्यानंतर स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावेत.

अस्वच्छ हातांमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. डायरिया, कॉलरा, मलेरिया, डेंगीसारख्या आजारांचे संक्रमण अस्वच्छतेमुळे होते. यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे हे पहिले कर्तव्य आहे. तसेच मुलांना हात धुणे हे पहिले कर्तव्य आहे, असे समजावून सांगावे.

— डॉ. सूचित बागडे, बालरोग तज्ज्ञ, नागपूर.

Health Care
Monsoon Health Tips : पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टींचं सेवन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com