Dry Cough: वारंवार कोरडा खोकला होतोय? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय | Home Remedies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dry Cough

Dry Cough: वारंवार कोरडा खोकला होतोय? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

बदलत्या वातावरणामुळे हल्ली कोरडा खोकल्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. धूर प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो आणि कोरडा खोकला येतो. अनेकदा रात्रीच्या वेळी कोरड्या खोकल्याचा अधिक त्रास होतो. अनेक औषध घेऊन सुद्धा कोरडा खोकल्यावर आराम पडत नाही. पण आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Health Tips : वजन कमी करायचंय ? ‘हे’ आयुर्वेदीक चुर्ण आजच सुरू करा !

  • तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही कोरड्या खोकल्यापासून सुटका करू शकता. त्यासाठी तुळशीचे पानं पाण्यामध्ये उकळून घ्यावी त्यामध्ये साखर थोडी साखर टाकावी. रात्री झोपण्यापूर्वी हा काढा प्यावा. यामुळे कोरड्या खोकल्याला आराम पडतो.

  • आले आणि मीठ मिक्स करा आणि ते दाढेखाली ठेवा त्याचा रस घशामध्ये घेतला की आले बाहेर फेका. त्यानंतर गुळण्या करा.

हेही वाचा: Cold Cough Tips: सर्दी-खोकला असेल तर आहारात समावेश करा 'या' फळाचा

  • आल्याचा वापरही कोरड्या खोकल्यावर गुणकारी ठरतो. सर्दी-खोकला झाल्यावर अनेक लोक आल्याच्या चहाचे सेवन करतात.

  • कप गरम पाण्यामध्ये दोन चमचे मध टाका आणि दिवसभर याचं सेवन करा. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा: Cough and cold: सर्दी-खोकला झालाय मग 'हे' घरगुती उपाय करून बघा लगेच आराम मिळेल

हळदीचे दुध प्रत्येक आजारासाठी उत्तम असते. जर तुम्हाला कोरडा खोकला असेल तर रोज रात्री हळदीचे दुध प्यावे. यामुळे कोरडा खोकल्याला सहज आराम मिळतो.

गुळ हा आरोग्यासाठी उत्तम आहे. गुळाच्या पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडतो त्यामुळे गुळाचे सेवन केल्यानेही कोरडा खोकला कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :lifestyleCoughhealth