Sugar Side Effects : साखर खाण्याने फक्त ब्लड शुगर लेव्हलच नव्हे 'या' समस्यांनीही त्रस्त व्हाल l health loss due to excess intake of sugar causes knee pain and health issues | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Side Effects

Sugar Side Effects : साखर खाण्याने फक्त ब्लड शुगर लेव्हलच नव्हे 'या' समस्यांनीही त्रस्त व्हाल

Sugar Side Effects : साखर खाल्ल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल वाढते.हे सगळ्यांनाच माहितीये. पण तुम्हाला हे माहितीये काय की साखर खाल्ल्याने तुमचे इतर शारीरिक त्रासही वाढू शकतात.

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, साखर जर कमी प्रमाणात खाल्ली तर त्याच काही नुकसान होत नाही मात्र हे प्रमाण वाढलं तर मात्र शरीराला मोठा अपाय होऊ शकतो . रोज ६ चमच्यांपेक्षा जास्त साखर तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरेल. तेव्हा साखर खाण्याचे तोटे जाणून घ्या.

साखर खाण्याचे तोटे

जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढणं, ह्रदयासंबंधी आजार,कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) लेव्हल मध्ये वाढ अल्झायमर यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे आता जर साखर जास्त खाणाऱ्यांमध्ये तुम्ही येत असाल सतर्क व्हा.

स्नायूंचं दुखणं आणि गुडघेदुखी

जर तुम्ही गुडघेदुखी आणि हात पाय दुखण्याच्या कुठल्याही समस्येने हैराण असाल तर याचं कारण कदाचित अतिगोड खाणं असू शकतं. इतकंच नाही तर शरीरात गोडाचं प्रमाण वाढलं तर मोतीबिंदू, मेमरी लॉससारखे आजार बळावू शकतात.

शरीरात ग्लुकोजची पातळी कमी जास्त होते

ग्लुकोज तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करते, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवणे फार महत्वाचे आहे.

जेव्हा तुम्ही साखर खाता तेव्हा पेशींमध्ये ग्लुकोज निर्माण करण्यासाठी इन्सुलिन सोडते, त्यामुळे तुम्हाला उर्जा मिळते. मग हे चक्र संपल्यानंतर तुम्हाला उर्जेची पातळी कमी झाल्यासारखी वाटते.कारण तुमचे शरीर अधिक साखरेची डिमांड करते.

अतिसाखरेच्या सेवनाने स्किनसंदर्भात तक्रारीसुद्धा वाढतात

साखरेचा समावेश असलेले पदार्थ इन्सुलिनची (Diabetes) पातळी वाढवतात आणि ग्लायकेशनची प्रक्रिया सुरु करतात.

ग्लुकोज तुमच्या रक्तात मिसळल्यास त्वचेचे रोगसुद्धा उद्भवू शकतात. कारण इंसुलिन त्वचेतील तेल ग्रंथींची अॅक्टिव्हीटी वाढवून जळजळ होण्याची प्रोसेस अॅक्टिव्ह करते.

टॅग्स :sugarblood pressurehealth