
Health : तुमचेही वजन वाढलंय का? हे पदार्थ खा, ज्याने कॅलरीज वाढणार नाहीत!
पुणे : वजन वाढलंय म्हणून टेंशन घेणारे लोक डाएटच्या नादी लागतात. आणि इच्छा नसताना खाण्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. पण, एखाद्या मित्राने ऑफर केल्यावर फास्ट फुडवर तुटून पडतात. अशाने वजन कमी नाही तर जास्तच वाढते. अशावेळी डाएटमध्ये काय खावे ज्याने आपल्यासा प्रोटीन आणि फायबर तर मिळेल.आणि तुमच्या कॅलरीजही वाढणार नाहीत.
आपण ठरवतो डाएट करायचं पण जेव्हा ते फॉलो करायची वेळ येते तेव्हा मात्र आपली तारांबळ उडते. त्यामुळेच आज असे काही पदार्थ पाहणार आहोत जे तूमची भुकही भागवतील आणि ते खाल्ल्याने तूमचे वजनही वाढणार नाही.
एनर्जी बॉल्स
हे एनर्जी बॉल्स ओट्स, ड्रायफ्रूट्स आणि नारळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांनी बनवले जातात. प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असलेले हे एनर्जी बॉल्स खाल्ल्याने तुम्ही तुमचे आरोग्य मेंटेन ठेवण्यात यशस्वी होता. हे हे एनर्जी बॉल्स बनवण्यासाठी काजू, बदाम, खजूर, खिसलेले खोबरे, खोबरेल तेल आणि कोको पावडर एकत्र करा. ते बारीक करून त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तूम्हाला काहीतरी खावे वाटेल तेव्हा या एनर्जी बॉल्सने भुक शांत करा.
केळी विथ बटर
हे असलं काहीतरी ऐकूण वेगळच वाटले ना. त्यावर तूम्ही म्हणाल की, एकतर केळी खावी किंवा बटर हे दोन्ही एकत्र म्हणजे पोटाची भेळच होईल. पण, केळी विथ बटर खाल्ल्याने काहीही त्रास होणार नाही उलट फायदाच होईल. गोड चवीची केळी आणि बदाम, शेंगदाणे, काजू यांचे बटर म्हणजे प्रोटीन आणि फायबरचा खजिनाच म्हणावा लागेल. केळीचे छोटे पातळ काप करून घ्या आणि त्यामध्ये कोणतेही बटर घालून खा.
स्ट्रॉबेरी विथ कोकोनट क्रीम
जेवणानंतर काहीतरी गोड खावेसे वाटत असल्यास स्ट्रॉबेरी आणि कोकोनट क्रीमचे डेझर्ट तूम्ही नक्की ट्राय करू शकता. यासाठी बाजारात मिळणारी कोकोनट क्रीम आणून त्यामध्ये व्हेनिला इसेन्स घालावा. क्रीम ग्राइंड करून परफेक्ट व्हीप क्रीम तयार करावी. या क्रीममध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे काप घालावेत. कोकोनट आणि स्ट्रॉबेरीमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.