Health Tips : धुळीची ऍलर्जी आहे ? करा हे उपाय

ऍलर्जी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी
Health Tips
Health Tipsesakal

पुणे : सध्या प्रदुषण इतके वाढले आहे त्यामुळे अनेक आजारांचा फैलाव होत आहे. पण, लोक बदलत्या वातावरणाला दोष देत आहेत. दुषित हवा, पाणी यामुळे ऍलर्जी होत आहे. हवेतील हे दुषित कण नाक आणि तोंडावाटे आपल्या शरीरात जातात.त्यामुळे ऍलर्जीचा त्रास होत आहे. या एलर्जीमुळे सर्दी होणे, नाक डोळे सुजणे, डोळे लाल होणे ते सतत चरचरणे यासारख्या समस्या होतात.

Health Tips
Health Tips : पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कँन्सर, जाणून घ्या लक्षणं

तुमचे नाक सुजले असेल, किंवा सतत नाकात खाज होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचसोबत शरीर पिवळे पडत असेल तर हा नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतात. त्यामध्ये ब्लडची आणि ऍलर्जीची टेस्ट करून समजू शकते.

Health Tips
Health Tips: पायात सारखे गोळे येताय? सावधान, 'ही' असू शकतात कारणं

एलर्जी स्किन टेस्ट

ही टेस्ट रूग्णाच्या काखेतील डस्ट पार्टिकल्सला स्पर्श करून केली जाते.

एलर्जी ब्लड टेस्ट

काही केसेसमध्ये एलर्जी स्किन टेस्ट करने योग्य नसते. त्यावेळी रुग्णाची ब्लड टेस्ट करून एलर्जीचे प्रमाण आणि कारण शोधले जाते.

Health Tips
Health Tips : महिलांनो शाकाहारी असाल तर सावधान? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

ऍलर्जी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी

घर स्वच्छ ठेवा. घरात धूळ साठू देऊ नका. यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करा.तुमचे बेडशीट आणि सोफा कव्हर नेहमी फ्रेश ठेवा. दर ३ दिवसाला बदलत रहा. बेड सोफ्याच्या गादीचीही साफसफाई करा.घरात लहान मुलांची खेळणी खरेदी करताना ती धुवून स्वच्छ करता येतील अशी निवडा. सॉफ्ट टॉईजवर धूळ जमा होते आणि ते धूतले की खराब होतात.तुमच्या घरात एफिशिएंसी मीडिया फिल्टर बसवा. तुमचे संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी ते मदत करेल.कार्पेट, पडदे, डोअर मॅट यासारख्या गोष्टी वेळोवेळी स्वच्छ करत रहा. या गोष्टींमध्ये धूळ शिरू शकते त्याचा अती त्रास होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com