Healthy Lifestyle: रात्री उशिरा जेवल्याने खरंच वजन वाढतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

healthy lifestyle

Healthy Lifestyle: रात्री उशिरा जेवल्याने खरंच वजन वाढतं?

रात्रीच्या जेवणाचा अनेकांचा एक परफेक्ट टाईम ठरलेला असतो. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा परफेक्ट टाईम तुमच्या आरोग्यासाठी परफेक्ट आहे का? अनेकांना रात्री जेवण उशीरा करण्याची सवय असते. पण उशीरा जेवल्याने आपल्या आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? आपलं वजन वाढतं का? या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. (eating late at night affect your body)

हेही वाचा: Weight Loss: आठवड्याभरात वजन होणार कमी, दररोजच्या कमी वेळेत 'या' गोष्टी फॉलो करा

अनेकांना रात्री उशीरा जेवण्याची सवय असते पण ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील काही समस्या खालीलप्रमाणे--

झोप न होणे - रात्री उशीरा जेवलात तर तुम्हाला झोप पण उशीरा लागेल त्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकणार नाही. त्यामुळे लवकर जेवण करा आणि लवकर झोपा. यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल.

ह्रदयाचा धोका वाढतो - रात्री उशीरा जेवल्याने हार्टच्याही समस्या वाढतात. उशीरा जेवल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि फॅट वाढतो ज्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

छातीमध्ये जळजळ होणे - उशीरा जेवल्यानंतर लगेच तुम्ही झोपायला जाता. अशात शरीराची हालचाल होत नाही आणि जेवलेल्या अन्नाचे पचनही होत नाही. त्यामुळे छातीत जळजळ निर्माण होते.

हेही वाचा: Weight Loss: ‘या’ खास गोष्टी घ्या आहारात, झटक्यात वजन कमी होणार

पोटाचा त्रास होणे - वेळी अवेळी जेवल्याने साहजिकच पोटाचा त्रास उद्भवतो. पोटदुखीमुळे आपण अनेक आजारांना घेऊन बसतो. त्यामुळे उशीरा जेवणे शक्यतो टाळावेत.

वजन वाढणे - आपण कधी जेवण करता, किती वेळा खातात आणि काय खातात हे खुप जास्त महत्त्वाचं आहे. वजन वाढण्याचं एक कारण असे असते की रात्री उशिरा जेवणे. कारण रात्री आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर रात्री जेवण करा

हेही वाचा: महिन्याभरात Fat Loss करायचंय? 'या' सात टिप्स न चुकता फॉलो करा

रात्रीचे जेवण हे आठ पर्यंत करावे. जेवण झाल्यानंतर तुम्ही शतपावलीसुद्धा करु शकता. विशेष म्हणजे जेवण करणे आणि झोपणे याच्यात दोन तासाचे अंतर असावे जेणे करुन तुम्ही जे जेवलात ते सहज पचणार. याशिवाय जेवण झाल्यानंतर लगेच बेडवर चुकूनही जाऊ नये.