डोकेदुखीमुळे त्रस्त आहात, मग या Hair Oil ने मालिश करा, डोकेदुखी होईल मिनिटांमध्ये दूर

डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक हर्बल हेअर ऑइलचा पर्याय निवडू शकता. या तेलामध्ये नैसर्गिक पेनकिलरचे गुणधर्म आढळतात. त्यामुळे या तेलांनी तुम्ही हेड मसाज Head Massage केल्यास तुमची डोकेदुखी काही मिनिटांमध्ये दूर होईल
उपाय डोकेदुखीवर
उपाय डोकेदुखीवरEsakal

खरं तर डोकेदुखी ही अत्यंत साधी समस्या आहे. आपल्यापकी अनेकांना कधी ना कधी या समस्येचा सामना करावा लागतच असतो. अपुरी झोप, कामाचा ताण, जास्त स्क्रिन टाइप किंवा पित्त अशी विविध कारणं डोकेदुखीसाठी Headache जबाबदार असतात. Health Tips Marathi Cure headache through hair oil massage

खरं तर ही सामान्य समस्या असली तरी काहीवेळा डोकेदुखी इतकी वाढते की कोणतही काम करणं अशक्य होतं. एवढचं काय तर वेदनांमुळे झोपही लागत नाही. अनेकजण डोकेदुखी Headache वाढू लागल्यास पेन किलरची मदत घेतात. मात्र वेळोवेळी पेनकिलर खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

अशावेळी डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक हर्बल हेअर ऑइलचा पर्याय निवडू शकता. या तेलामध्ये नैसर्गिक पेनकिलरचे गुणधर्म आढळतात. त्यामुळे या तेलांनी तुम्ही हेड मसाज Head Massage केल्यास तुमची डोकेदुखी काही मिनिटांमध्ये दूर होईल.

हर्बल ऑइल मसाजमुळे Herbal Oil Massage कोणतेही साइड इफ्टेक्टही होणार नाहीत. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. शिवाय डोकेदुखी थांबण्यासोबतच या तेलाचा तुमच्या केसांना देखील फायदा होईल.

डोकेदुखील थांबण्यासाठी हर्बल Hair Oil

पुदीना तेल- डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या तेलाने मालिश करू शकता. पुदीनामध्ये मेंथॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. मेंथॉल नसांना ट्रिगर करून सुन्न करतं. यामुळे तुम्हाला आराम मिळतो.

तसंच खास करून तणाव आणि चिंतेमुळे जर तुमचं डोकं दुखत असेल, तर पुदीना तेलाचा मसाज तुम्हाला नक्कीच आराम देईल आणि तुम्हाला स्ट्रेस फ्री वाटेल. मेंथॉलमुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. खास करून मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी पुदीना तेलाचं मसाज उपयुक्त ठरतं.

हे देखिल वाचा-

उपाय डोकेदुखीवर
Icecream Headache : आईस्क्रीम खाल्ल्यावर डोकेदुखी होत असेल तर काय कराल ?

केमोमाइल ऑइल- डोकेदुखी दूर करण्यासाठी केमोमाइल हर्बल ऑइल देखील तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. या तेलाने मसाज केल्यास थकवा किंवा चिंतेमुळे होणारी डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

या तेलाने मसाज केल्यास डोकं शांत होत आणि शांत झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे तुमची डोकेदुखी देखील दूर होते. मात्र गरोदर महिलांनी या तेलाचा वापर करू नये.

रोजमेरी ऑइल- रोजमेरी ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीइंफ्लेमेटरी आणि अनाल्जेसिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे तणाव आणि वेदना कमी होण्यास मदत होते. यामुळेच डोक दुखत असल्यास तुम्ही रोजमेरी ऑइलने थोडा मसाज करावा.

यामुळे अनिद्रेची समस्या दूर होते. स्नायूंना आराम मिळाल्याने डोकेदुखी दूर होवून शांत झोप लागते.

लवेंडर ऑइल- खास करून मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी लवेंडर आइलचा वापर उपयुक्त ठरतो. तुम्ही लवेंडर ऑइलचा वास घेल्याने देखील आराम मिळतो. किंवा लवेंडर ऑइलचे काही थेंब घेऊन कपाळाला हलक्या हाताने मालिश केल्यास मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना दूर होण्यास मदत होते.

निलगिरी तेल- स्नायूंच्या आणि सांधेदुखीसाठी अनेक वर्षांपासून निलगिरी तेलाचा वापर केला जातो. मज्जासंस्थेला आराम देऊन डोकेदुखी कमी कऱण्यास निलगिरी तेल उपयुक्त ठरतं. निलगिरी तेल इनहेल म्हणजे या तेलाच्या वासाने देखील डोके दुखी कमी होण्यास मदत होते. शिवाय या तेलाचे काही थेंब कपाळावर लावून मालिश केल्यास तुमची डोकेदुखी दूर होईल.

अशा प्रकारे पेनकिलर घेण्याएवजी तुम्ही प्राथमिक उपाय म्हणून या हर्बल तेलांचा डोकेदुखी कमी करण्यासाठी नक्कीच वापर करू शकता.

हे देखिल वाचा-

उपाय डोकेदुखीवर
Headache Causes: डोकेदुखीवर Instant Relief हवाय तर गोळी नको हे उपाय करा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com