Health Tips: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का? ताबडतोब करा हे उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का? ताबडतोब करा हे उपाय

बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही. तीव्र डोकेदुखी होते. मग दिवसभर थकल्यासारखे वाटते. असे होत असेल तर काळजी घ्यायला हवी.

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात

  • शरीर डिहाइड्रेट झाले असले तरी तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

  • तुम्हाला तणाव असेल तर हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते.

  • खूप दारु प्यायली असेल

  • बराच वेळ उन्हात राहिलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.

    तसे असेल तर तुम्ही सावध व्हावे. त्यासाठी काही उपाय जाणून घ्या. जे सकाळी उठल्यावर जी डोकेदुखी होते ती दूर होईल.

हेही वाचा: Health Tips: शतपावलीचा मानसिक आरोग्यावर होतो परिणाम

सकाळच्या डोकेदुखीवर उपाय

जर तुम्हाला सकाळच्या डोकेदुखीपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील.

भरपूर झोप घ्या

7-8 तासांची झोप डोकेदूखीवर नक्कीच उपयुक्त आहे. याशिवाय ठराविक वेळेत झोपा. रात्री उशिरापर्यंत जागू नका. रात्री लवकर झोपायला जा.

व्यायाम करा

रोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने सकाळी डोकेदुखीची तीव्रता आणि वारंवारता कमी होईल.

हेही वाचा: Health News: डेंग्यू पेशंटच्या डाएटमध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश, होईल फास्ट रिकव्हरी

सकस आहार घ्या

तुम्हाला निरोगी आणि सकस आहार घेतला पाहिजे. याशिवाय शरीराला हायड्रेट ठेवा. अधिकाधिक पाणी प्या.

डोकेदुखीसाठी डायरी ठेवा

एक डायरी मेंटेन करा. डायरीमध्ये लिहा की तुम्हाला किती वेळा डोकेदुखी होती आणि किती काळ. असे केल्याने, तुम्हाला डॉक्टरांकडून उपचार घेणे आणि त्यांना तुमची स्थिती सांगणे सोपे होईल.

ताण घेऊ नका

जर तुम्ही ध्यान आणि योगासन केले तर तुम्ही सकाळच्या डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता. दररोज ध्यान आणि योगासने केल्याने तुमचे मन एकाग्र होईल. मन शांत राहील.

Web Title: Health Tips Morning Headache Try These Solutions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Headachehealth