

Ensure balanced meals for healthy child growth.
Sakal
प्रश्न १ : माझी मुलगी सात वर्षाची आहे. मात्र वयाच्या मानाने तिचं वजनही वाढत नाही व उंची सुद्धा वाढत नाही. तिच्या वर्गात ती सगळ्यात छोटी वाटते. याच्या करता काय उपचार करावे? कृपया सांगावे.
- राहुल गुजर, दादर.
उत्तर : प्रत्येक मुलांमध्ये अनुवंशिकतेप्रमाणे उंची वाढण्याची किंवा वजन वाढण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. मुलींमध्ये साधारणता दहा बारा वर्षाच्या वयात उंची वाढताना जास्त प्रमाणात दिसते. उंची वाढवण्याकरता व तसेच वजन व्यवस्थित राहण्याकरिता मुलीला पोषणमूल्य युक्त अन्न देणे अत्यंत गरजेचे आहे. रोज सकाळी व संध्याकाळी एक कप गरम दूध संतुलन चैतन्य कल्प बरोबर द्यावे. शक्य असल्यास या दूधामध्ये आठवड्यातून दोन तीनदा तरी अर्धा चमचा खारकेची पूड घालून उकळून दूध तयार करून दिलेले जास्त उत्तम राहील. आहारामध्ये घरचे बनवलेले साजूक तूप, लोणी, नाचणी सत्व, गव्हाची तूप लावलेली पोळी, अमृत शर्करायुक्त पंचामृत, बदाम, अक्रोड इत्यादी आवर्जून ठेवावे. या सगळ्यामुळे शरीर शक्ती तर वाढेलच पण त्याच बरोबरीने विकासही व्यवस्थित व्हायला मदत होऊ शकेल. तसेच आठवड्यातून दोनदा तीनदा तरी संपूर्ण अंगाला संतुलन अभ्यंग सारख्या एखाद्या तेलाने अभ्यंग नक्की करावे. याने सुध्दा विकास व्यवस्थित व्हायला मदत मिळू शकेल.