Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Lifestyle

Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट

बदलत्या राहणीमानानुसार पोट वाढल्याच्या अनेक समस्या दिसतात. त्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. ब्रेकफास्ट, जेवण, एवढंच काय तर योगा, व्यायम यासारखे अनेक उपाय ट्राय केले जातात. मात्र अनेकदा त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही.

आज आम्ही तुम्हाला ब्रेकफास्टमधील काही बदलांमुळे पोट कसं सपाट किंवा फ्लॅट होतं, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (do these changes in breakfast you will seem weight loss)

  • उठल्यानंतर लगेच शरिराला एनर्जीची आवश्यकता असते. त्यामुळे उठल्यानंतर अर्धा तासामध्ये नाश्ता करा. जर तुम्ही असं नाही कराल तर तुमची पचनशक्ती मंदावते आणि कॅलरी बर्न होणे बंद होते.

  • उठल्यानंतर लगेच एक ग्लास पानी प्या. याशिवाय जेवणापूर्वी दोन ग्लास पानी पित असाल तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा: Healthy Lifestyle: खायच्या पानामध्ये चुना का लावतात?

  • सकाळी उठल्यानंतर गोड खाऊ नका. कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

  • सकाळी फायबरयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. कारण फायबरयुक्त आहार घेतल्याने पोट भरते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात फायबरयुक्त आहार घेणे चांगले आहे.

  • सकाळी उठल्यानंतर अर्धा तासाच्या आतमध्ये तुम्ही चहा, ग्रीन टी किंवा कॉफी घेत असाल तर तुमची पचनशक्ती सुधारते. कॅलरी बर्न होण्यास अधिक मदत होते.