Healthy Lifestyle: खायच्या पानामध्ये चुना का लावतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chuna

Healthy Lifestyle: खायच्या पानामध्ये चुना का लावतात?

भारतीय संस्कृतीत खायच्या पानाचे विशेष महत्त्व आहे. फार पूर्वी काळापासून जेवण झाल्यानंतर पान खाल्ले जायचे आणि आजही तेवढ्याच आवडीने जेवणानंतर किंवा कोणत्या समारंभात पान खाल्ले जाते.

विलायची, केसर, लवंग, सुंठ, विलायची ,सोप, गुलकंद, खोबरा खिस व चुना या सर्वांचा उपयोग म्हणून पान बनविले जातात. त्यामुळे ते अधिक टेस्टी वाटतात. पण तुम्हाला माहिती आहे का खायच्या पानामध्ये चुना का लावतात? (why chuna include in betel leaf or paan)

हेही वाचा: Healthy Lifestyle : अष्टांग योगाने करा आरोग्यप्राप्ती

आरोग्यासाठी उत्तम असलेल्या खायच्या पानात लावत असलेला चुना आपल्यासाठी अधिक फायदेशीर असतो. चला तर या चुनाचे कोणते फायदे आपल्याला होतात, हे सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुना हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे.

  • हाडांचे विकार, कॅल्शियम कमतरता किंवा पाठीच्या कणाशी निगडित समस्यांसाठी चुना फायदेशीर आहे.

  • हाडांच्या बळकटीसाठी, वजन वाढण्यासाठी, उंची वाढण्यासाठी कॅल्शिअम महत्त्वाचं काम करतो.

हेही वाचा: Lifestyle: झोपण्यापूर्वीच्या ‘या’ सवयी आजच बदला नाहीतर तुमचा चांगला चेहरा...

  • पाठीचं दुखणं सांधे ,खांदे ,स्पॉन्डिलाइटिस, हाडांना दुखापत किंवा हाडांची निगडित कुठलीही समस्यांसाठी चुना फायदेशीर आहे.

  • उत्तम स्मरणशक्ती, उंची, धष्ट पुष्ट, तंदुरुस्त यासाठीही चुना लाभकारी असतो.

  • असं म्हणतात की गर्भपनात चुना खाल्लेल्या आईचे मूल हे अतिशय हुशार असत तसेच सहजासहजी आजारी ही पडत नाही.

टॅग्स :lifestylehealth