Blood Pressure : बीपीचा त्रास तुम्हालाही आहे? दररोज अंजीर खा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anjeer

Blood Pressure : बीपीचा त्रास तुम्हालाही आहे? दररोज अंजीर खा

डॉक्टर नेहमी सांगतात की ड्रायफ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते. आज आपण एका अशा ड्रायफ्रुट्स विषयी जाणून घेणार आहोत ज्याचे अनेक फायदे आहे. हो, आज आपण अंजीरच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदमध्ये अंजीरचे अनेक फायदे सांगितले आहे. एवढंच काय तर डॉक्टर आणि एक्सपर्ट रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्यात जर तुम्ही दररोज दोन ते तीन अंजीर खात असाल तर आपल्याला अनेक फायदे होणार. चला तर या फायद्यांविषयी अधिक जाणून घेऊया.

  • अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणार फायबरचे प्रमाण असते. वजन कमी करण्यासाठी अंजीरचे सेवन करणे हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही अंजीरला दूधात उकळून पिऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

  • जर तुम्हाला निद्रानाशची समस्या असेल तर अंजीर खाणे, यासाठी पर्याय आहे. अंजीरचा उपयोग तुम्ही मिठाई, शिरा बनविण्यासाठी पण करू शकता. शुगरच्या पेशंट ही मिठाई खाऊ शकतात. दुपारच्या जेवणातही तुम्ही अंजीर खाऊ शकता. याशिवाय अंजीरपासून तुम्ही सॅलेडही बनू शकता.

हेही वाचा: Anjeer Milk : हिवाळ्यात अंजीरचे दूध प्यायल्याने शरीराला मिळतात हे फायदे

  • ज्या पेशंटला अस्तमा, टीबी, हाय ब्लड प्रेशर किंवा पोटाशी निगडीत समस्या असतात त्यांच्यासाठी अंजीर रामबाण उपयोग करतात. यासाठी तुम्हाला तीन अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावे लागेल.

  • अंजीरमध्ये ओमेगा-3 आणि 6 सारखे फॅटी अॅसिड असतात जे आपल्या हार्टसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरिराचं मेटाबॉलिजम वाढते.