Climbing Stairs : पायऱ्या चढताना तुमचाही दम लागतो? मग हे वाचाच | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Climbing Stairs

Climbing Stairs : पायऱ्या चढताना तुमचाही दम लागतो? मग हे वाचाच

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. ज्यामुळे आपल्या शरिरावर याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. अनहेल्दी जेवण असो की फिजिकल इनअॅक्टिविटीमुळे अनेक लोक आतून कमकुवत फिल करतात.

अशात अनेकांना पायऱ्या चढताना दम लागतो. जर तुम्हाला पायऱ्या चढताना दम लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला यावर काही खास टिप्स देणार आहोत. सहसा दोन तीन मजली पायऱ्या चढल्या की कोणाचीही दम लागतो पण अगदी तीन-पाच पायऱ्या चढल्या तरी तुमचा दम लागत असेल तर हे लक्षण धोकादायक आहे. यावर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे आहे. चला तर सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Sex Life: तुमच्या वैवाहिक जीवनात सेक्स किती Important आहे ? या पाच गोष्टी वाचाच

पायऱ्या चढताना दम का लागतो?

अनेकदा असं होतं की आपल्याला काही पायऱ्या चढताच दम लागतो. खरं तर ही सामान्य गोष्ट नाही. यामागे अनेक गंभीर कारणे असू शकतात. सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पोषक तत्व आणि एनर्जीची कमतरता असणे. अनेकदा शरिराला न्यूट्रिएंट्स मिळाल्यानंतरही थोडी जरी बॉडी एक्टिविटी केली तरी लोक थकतात. यामागे झोप न येणे, मानसिक रोग आणि अॅनेमिया सारखे कारणे असू शकतात.

हेही वाचा: Weight Loss: वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही 'या' चुका करता का?

ही घ्या विशेष काळजी

वजन वाढीवर कंट्रोल ठेवा.
झोपायची आणि उठायची वेळ ठरवा.
पुर्ण झोप घ्या आणि दिवसा झोपणे टाळा.
हेल्दी डाइट घ्या आणि पोषक तत्व असलेला आहार घ्या.
नियमित व्यायाम करा कारण एक्सरसाइज करणे आवश्यक आहे.

(Disclaimer: वरील माहिती घरगूती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया ही माहिती अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

टॅग्स :lifestylehealth